• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युवकाची नैराश्यातून आत्महत्या

by Ganesh Dhanawade
May 9, 2022
in Guhagar
17 1
0
युवकाची नैराश्यातून आत्महत्या
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी वेळंब रोड येथील 25 वर्षीय युवकाने पाटपन्हाळे येथे एका मंदिराच्या मागील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या नैराश्यातून केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. suicide due to depression

Suicide due to Depression

सोमवारी (ता. 9 मे) दुपारी पाटपन्हाळे येथील एकमुखी दत्तमंदिराच्या मागे काजुच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह ग्रामस्थांना दिसला. तातडीने स्थानिक ग्रामस्थांनी गुहागर पोलीसांना कळविले. या घटनेची माहिती श्रृंगारतळी वेळंब रोड येथे रहाणाऱ्या आरेकर कुटुंबाच्या हितचिंतकांपर्यंत पोचली. सिद्धेश 7 मे रोजी सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला होता. तो दोन दिवसात घरी आला नव्हता. शंकेची पाल चुकचुकली. तातडीने आरेकर कुटुंबियांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सदर आत्महत्या करणारा युवक म्हणजे 25 वर्षीय  सिध्देश बळीराम आरेकर असल्याचे लक्षात आले.  कुटुंबियांनी मृतदेहाची खात्री केल्यानंतर पोलीसांनी पंचनामा करण्यास सुरवात केली. त्यावेळी सिध्देशच्या हातात एक कागद असल्याचे लक्षात आले. हा कागद पोलीसांनी तपासला. सिध्देशने आपण निराश झाल्याने आत्महत्या करत असल्याचे समोर आले.

खरतरं सिध्देशचं कुटुंब मुळ गुहागरचे. सिध्देशचे आई वडिल, बहिणी हे सर्वजण गुहागरमध्ये रहात होते. सिध्देशचे वडिल बळीराम आरेकर गुहागर ग्रामपंचायतीमध्ये नोकरीला होते. त्यांचे निधन झाल्यानंतर काही वर्षांनी हे कुटुंब शृंगारतळीला रहायला गेले. आजही सणासुदीला हे कुटुंब गुहागरला येत असे. त्यामुळे सिध्देशच्या आत्महत्येनंतर गुहागरमधील अनेकांना धक्का बसला आहे. suicide due to depression

गुहागर पोलिसांनी पंचनामा करून सिद्धेशचा मृतदेह चिखली येथील प्राथमिक रुग्णालयांमध्ये अधिक तपासणीसाठी नेला. सायंकाळी 6 च्या दरम्यान शवविच्छेदनाची प्रक्रिया झाल्यावर पोलीसांनी सिध्देशचा मृतदेह आरेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्या. त्यानंतर शोकाकुल वातावरणात शृंगारतळी येथील स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. सिद्धेशच्या पश्चात तीन बहिणी, आई असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील शिवलकर करत आहेत. suicide due to depression

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarsuicide due to depressionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.