युवा मंडळाचे आयोजन : विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
गुहागर ता. 8 : खालचापाट येथील प्रसिद्ध श्री वराती देवीच्या मंदिरात श्री वराती देवी युवा मंडळाच्यावतीने दि. ९ ते १2 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भजनाची डबलबारी, नमन, कुंकुमार्चन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. (Satyanarayan Pooja in Varati Temple)

यानिमित्ताने उद्या दि. ९ रोजी सकाळी ७ ते ८ वा. देवीची षोडशोपचारी पूजा व अभिषेक, दुपारी १२.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, सायं. ४ ते ५ वा. कलावती आई महिला मंडळाचे भजन, ७.१५ वा. महाआरती, ७.३० ते १० वा. स्थानिक सुस्वर भजने, रात्री १० वा. रत्नागिरी कोतवडे येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विजय मयेकर यांचे व शिपणे येथील श्री वक्रतुंड भजन मंडळाचे संतोष पांचाळ यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. (Satyanarayan Pooja in Varati Temple)

दि. १० रोजी सकाळी ७ ते ८ वा. देवीची षडोशोपचार पूजा, सायंकाळी ४ ते ६ वा. हळदीकुंकू कार्यक्रम, रात्री १० वा. महिलांचे विविध कार्यक्रम, दि. ११ रोजी सकाळी ७ ते ८ वा. देवीची षडोशोपचार पूजा, ८ ते ९ वा. देवीवर कुंकूमार्चन व मंत्रपठण, रात्री १० वा. वरवेली खालचीवाडी नवतरुण नमन मंडळाचे बहुरंगी नमन सादर केला जाणार आहे. दि. १२ रोजी सकाळी ७ ते ८ वा. देवीची षडोशोपचार पूजा, रात्री ८ वा. देवीचा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (Satyanarayan Pooja in Varati Temple)

यानिमित्ताने श्री वराती देवीचा गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सभागृह आणि परिसर रंगीत वस्त्रांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री वराती देवी युवा मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा मंडळाने केले आहे. (Satyanarayan Pooja in Varati Temple)
