• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरोग्यम लँबोरेटरी श्रुंगारतळीत

by Guhagar News
May 7, 2022
in Guhagar
21 0
0
आरोग्यम लँबोरेटरी श्रुंगारतळीत

आरोग्यम लँबोरेटरी श्रुंगारतळीत उद्घाटन

42
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तिसरी शाखा :  कॅन्सर, हार्मोन्स, व्हिटॅमिन्स आदी तपासण्या उपलब्ध

गुहागर, ता. 7: चिपळूण मधील सुप्रसिद्ध आरोग्यम् लॅबोरेटरीच्या शृंगारतळी येथील शाखेचे उद्घाटन दिनांक 3 मे 2022 रोजी मा. आमदार डॉ. विनय नातू, ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. एस. पी. जवळगीकर व डॉ. मुकुंद डबीर यांचे हस्ते करण्यात आले. गेली तेरा वर्षे सौ. सांची बेलवलकर यांच्या तर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘पंकज क्लिनिकल लॅबोरेटरी’ च्या सहयोगाने या शाखेचे कामकाज चालणार आहे. आरोग्यम् लॅबोरेटरीची चिपळूण परिसरातील ही तिसरी शाखा आहे. यापूर्वी शिरगाव व लोटे या ठिकाणी लॅबोरेटरीच्या शाखा कार्यरत आहेत. Arogyam Laboratory in Shrungartali

” डॉ. तेजानंद गणपत्ये व डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी आरोग्यम् लॅबोरेटरी च्या माध्यमातून कॅन्सर, हार्मोन्स, व्हिटॅमिन्स व इतर तपासण्या ज्या आधी पुण्या-मुंबईला पाठवायला लागत होत्या त्या  चिपळूणमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट सेवा देणारी लॅबोरेटरी’ असा आरोग्यम् चा नावलौकिक आहे. शृंगारतळी व गुहागर परिसरातील रुग्णांना ह्या सेंटरचा नक्कीच फायदा होईल” असे गौरवोद्गार डॉ. विनय नातू यांनी उद्घाटन प्रसंगी काढले. Arogyam Laboratory in Shrungartali

शृंगारतळी शाखेमध्ये शुभारंभ ऑफर म्हणून दि 4 मे ते 11 मे हा आठवडाभर दोन्ही वेळची शुगर तपासणी पूर्णपणे मोफत करून देण्याचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाला शृंगारतळी चे सरपंच संजय पवार, परिसरातील नामवंत डॉक्टर – डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सुभाष विखारे, डॉ. सुरेश भाले, डॉ. मंदार आठवले, डॉ. सन्मान बेलवलकर, डॉ. दिप्ती जावकर, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. श्रीकांत मडके, डॉ. प्रकाश शिर्के, डॉ. प्रमोद हंचाटे, डॉ. कौस्तुभ हुईलगोल, डॉ. प्रशांत काळे, डॉ. जरार साल्हे, गुहागर फार्मसी संघटनेचे अध्यक्ष श्री. नितीन बेलवलकर तसेच नामवंत उद्योजक श्री राजन दळी, श्री. मोहन संसारे, श्री. अनिरुद्ध भावे, श्री. शाबिरभाई साल्हे, श्री. अब्बासभाई कारभारी, श्री. विशाल बेलवलकर, श्री. स्वप्निल बेलवलकर, आरोग्यम् लॅबोरेटरी चे डॉ. प्रदीप कापडेकर हे उपस्थित होते. शृंगारतळी शाखेमध्ये शुभारंभ ऑफर म्हणून दि 4 मे ते 11 मे हा आठवडाभर दोन्ही वेळची शुगर तपासणी पूर्णपणे मोफत करून देण्याचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी जाहीर केले. Arogyam Laboratory in Shrungartali

Tags: Arogyam Laboratory in ShrungartaliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.