• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

by Guhagar News
May 7, 2022
in Guhagar
17 0
0
Teachers felicitated at Kotluk

सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करताना.

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ;  १० वीतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील कोतळूक येथील उदमेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्यावतीने  ना. गोपाळकृष्ण गोखले विद्यालयातील वयोमानानुसार सेवानिवृत्त शिक्षक व गेल्या दोन शैक्षणिक वर्षात विद्यालयातील १० वी मधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.  Teachers felicitated at Kotluk

१९९० मध्ये कोतळूक येथे ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने, आर्थिक सहकार्यातून प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ना.गोपाळकृष्ण गोखले विदयालय या नावाने ८ वी ते १० वी शिक्षण देणारे हायस्कूल सुरू झाले. . सुरूवातीच्या खडतर प्रवासात शिक्षक वृंदानी ग्रामस्थांना बहुमोल असे योगदान दिले. विनाअनुदानित विद्यालय सुरू असताना कमी मानधनावर आत्मियतेने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्याचे काम शिक्षक करत होते. Teachers felicitated at Kotluk

ना. गोपाळकृष्ण गोखले विद्यालयातील तीन शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने तसेच गेल्या दोन शैक्षणिक वर्षात ना.गोपाळकृष्ण गोखले विद्यालयातील १० वी मधील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले आहे. आजपर्यंत १२ वेळा या हायस्कूलचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर इतर वेळीसुद्धा ९० टक्केपेक्षा जास्त निकाल लागला आहे, ही शिक्षकांची मेहनत दिसून येते. Teachers felicitated at Kotluk

विद्यालयाच्या यशामध्ये बहुमोल असे योगदान असलेले या शाळेचे मुख्याध्यापक मोहन नांगरे सर ( ३१ वर्षे), हनुमंत सुतार सर (३२ वर्षे), शिरतोडे सर (२९वर्षे) हे तीन शिक्षक नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. आपल्या कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देत योग्य मार्गदर्शन केल्याने या विद्यालयातील विद्यार्थी हे विविध क्षेत्रात अग्रेसरपणे कार्यरत आहेत. आडके सर, बनसोडे सर यांनी सुद्धा चांगले मार्गदर्शन केले. शिक्षकांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उदमेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ कोतळूक उदमेवाडी यांच्यावतीने शाल व भेटवस्तू देऊन हा सत्कार करण्यात आला. Teachers felicitated at Kotluk

यावेळी उदमेवाडी माजी अध्यक्ष, माजी सरपंच दत्तात्रय ओक, विद्यमान अध्यक्ष अनंत चव्हाण, आबा आरेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, सेक्रेटरी मंदार गुहागरकर, कमलाकर महाडीक, महिला मंडळ अध्यक्ष सौ.श्रद्धा बागकर, उपाध्यक्ष सौ. अनुजा चव्हाण आदींसह मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर ओक यांनी केले. Teachers felicitated at Kotluk

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTeachers felicitated at Kotlukटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.