• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे सोसायटीच्या चेअरमनपदी मंगेश सोलकर

by Guhagar News
May 7, 2022
in Guhagar
16 1
0
Solkar as the Chairman of Peve Society
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्हा. चेअरमनपदी खालिद खान; बिनविरोध निवड

गुहागर, ता. 07 :  पेवे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ अशी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये पहिल्या सत्रात १३ संचालक बिनविरोध निवडून आले.  यामध्ये खामशेत गावचे सरपंच श्री. मंगेश सोलकर यांची चेअरमनपदी तर पेवेचे समाजिक कार्यकर्ते खालीदभाई खान यांची व्हा. चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. Solkar as the Chairman of Peve Society

दुसऱ्या सत्रात गुहागरचे सहाय्यक उपनिबंधक श्री. देवरूखकर, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उपस्थितीत चेअरमन आणि व्हा. चेअरमन निवडणूक संपन्न झाली. यामध्ये खामशेत गावचे सरपंच श्री. मंगेश सोलकर यांची चेअरमनपदी तर पेवेचे समाजिक कार्यकर्ते खालीदभाई खान यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Solkar as the Chairman of Peve Society

सुमारे ७५० सदस्य संख्या असलेल्या पेवे विकास सोसायटीमध्ये पेवे, खरेकोंड, खामशेत, पारदळेवाडी या महसुल गावांचा समावेश आहे. या विकास सोसायटीची स्थापना सन १९६० साली झाली असून गेली अनेक वर्ष या सोसायटीतर्फे गावातील शेतकऱ्यांना खत पुरवठा तसेच हंगामी वर्षासाठी कर्ज वाटप केले जाते. या सोसायटीची सन २०२२ ते २०२७ अशी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये संचालक पदावर श्री. निसारखान सरगुरो, श्री. रामचंद्र टेरवकर, श्री. मुबीन पेवेकर, श्री. सुभाष जाधव, श्री. सुरेश महाडीक, श्री. सुरज हरचिलकर, श्री. मंगेश सोलकर, श्री. खालीदखान, श्री. वसंत शिगवण, श्री. हरिश्चंद्र माने, श्री. राजेंद्र भालेकर, सौ. रणिता पारदळे, सौ. संध्या महाडीक हे संचालक बिनविरोध निवडून आले. या संचालकांची सभा पेवे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाली. Solkar as the Chairman of Peve Society

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSolkar as the Chairman of Peve Societyटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.