सन्मित्रचा पुढाकार, नगरपंचायतीचे सहकार्य
गुहागर, ता. 07 : शहराचे प्रवेशद्वार म्हणजे लाकडीपुलाजवळील शिवाजी चौक. हा चौक आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आहे. तसा नामफलक ही येथे लावण्यात आला आहे. 65 वर्षांपूर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा त्रिशतसांवत्सरिक शिवराज्याभिषेक स्मृती प्रित्यर्थ स्थापन करण्यात आला होता. Naming Shivaji Chowk of Guhagar


गुहागर शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा लाकडीपुलाजवळ आहे. तेव्हा पासून या परिसराला शिवाजी चौक म्हणून ओळखले जाते. 1957 पासून सन्मित्र मंडळ या स्थानाची देखभाल, दुरुस्ती आणि उत्सव करते. अक्षयतृतीयेच्या आदल्या दिवशी (वैशाख शुद्ध द्वितीया) येथे परंपरागत शिवजयंती साजरी केली जाते. Naming Shivaji Chowk of Guhagar
या चौकाचे नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आहे. सन्मित्र मंडळाने या नामकरणासाठी पुढाकार घेतला. गुहागर नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष राजेश बेंडल हे देखील या मंडळाचे सभासद आहेत. त्यांनी देखील चौकाच्या नामबदलाला संमती दिली. त्यानंतर येथील नामफलक बदलण्यात आला. Naming Shivaji Chowk of Guhagar


शहर भाजपने केले अभिनंदन
गुहागर शहर भाजपने शिवाजी चौकाचे नाव बदलुन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक करावे. अशी मागणी दिनांक ११/०२/२०२२ ला निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीची पूर्तता झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी नगराध्यक्ष राजेश बेंडल व सन्मित्र मंडळ यांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला हार अर्पण केला. यावेळी भाजपचे नगरसेवक समीर घाणेकर , भाजपा गुहागर शहराध्यक्ष संगम मोरे, भाजपा युवमोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, भायुमोर्चा शहरउपाध्यक्ष अमोल ग़ोखले व हेमंत बारटक्के उपस्थित होते. Naming Shivaji Chowk of Guhagar