• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पत्रकार संघाचा गंगाखेडमध्ये सन्मान

by Guhagar News
May 6, 2022
in Guhagar
16 0
0
Kane Adarsh Award in to Guhagar
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्व. वसंत काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

गुहागर, ता. 06 : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गुहागर तालुका पत्रकार संघाला स्व. वसंत काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगाखेड मध्ये पत्रकार परिषदेचे राज्य स्तरीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि स्वागताध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. Kane Adarsh Award in to Guhagar

महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत उत्तम काम करीत आहेत. त्याचबरोबर गुहागर तालुका पत्रकार संघाने कोरोना काळात परप्रांतीयांना शिधा वाटप केले. कोरोनाच्या दुसर्या लाटेत वेळणेश्वरच्या कोविड केअर सेंटरमधील दुरावस्था समोर आणली. यावर्षी पावसाळ्यात चिपळूणला महापूर आला. त्या पूरग्रस्तांना मदत, त्यानंतर पत्रकार, वृत्तपत्र एजंट यांना मदत केली. सलग दोनवेळा रक्तदान शिबिर घेतले. गुहागर तालुका पत्रकार संघाने 2019 मध्ये नगरपंचायत क्षेत्रातील घरपट्टी वसुलीचे गणित चुकीचे असल्याचे दाखवून दिले. पाठपुरावा केला. गुहागर विजापूर रस्त्याबाबत केंद्रीय वहातूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार,  यांना निवेदन दिले. Kane Adarsh Award in to Guhagar

या सगळ्या कामांची दखल घेऊन मराठी पत्रकार परिषदेने आज गंगाखेड येथे राज्य अधिवेशनात गुहागर तालुका पत्रकार संघाला पुरस्कार देवून सन्मानित केले. हा पुरस्कार गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मयुरेश पाटणकर, मनोज बावधनकर, सत्यवान घाडे, गणेश धनावडे यांनी स्विकारला. Kane Adarsh Award in to Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsKane Adarsh Award in to GuhagarKovidLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.