राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते प्रदान
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील प्रगतशील शेतकरी शेखर शिवाजीराव विचारे यांचा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने उद्यान पंडित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा शेतकरी सन्मान राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात आला. नुकताच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दिंडोरी रोड, म्हसरुळ नाशिक येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. Udyan Pandit Award to Vichare of Varveli


यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, कृषी प्रधान सचिव एकनाथ डबले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते. Udyan Pandit Award to Vichare of Varveli


शेतकरी शेखर विचारे यांनी सेंद्रिय खतांचा वापर करत फळझाडांचे अत्यंत उत्कृष्ट उत्पादन घेतले. फळांचे पॅकिंग व ग्रेडिंग करण्यासाठी पॅक हाऊसची उभारणी केली. सन २०१८ पासून अभिनव फार्मर्स क्लबच्या अंतर्गत सेंद्रिय शेतीसाठी भुसखा नावाचा गट कार्यान्वित करण्यात श्री. विचारे यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच आंबा निर्यातीसाठी संपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे अभिजित गडदे, अमोल क्षीरसागर, रोहन चोथे, श्रीमती. भक्ती यादव, भीमाशंकर कोळी, संजय सानप, श्रीमती माधुरी पवार यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. Udyan Pandit Award to Vichare of Varveli