गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातून 80 विद्यार्थी बसले होते. गुहागर तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिराची विद्यार्थिनी कु. आर्या मंदार गोयथळे हिने प्राथमिक गटात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. Goyathale first in Science Ranjan Competition

यामध्ये प्रथम कुमारी आर्या मंदार गोयथळे, द्वितीय किमया दिनेश नेटके ( माध्यमिक विद्यालय आबलोली), तृतीय समर्था मंदार मोरे (श्री देव गोपाल कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर) यांनी यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, शिक्षक यांनी अभिनंदन केले. या विज्ञान रंजन स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातून प्राथमिक गटात 80 विद्यार्थी बसले होते. Goyathale first in Science Ranjan Competition

यशस्वी विद्यार्थ्यांचे सदर परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभ जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर घेण्यात येणार आहे. असे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी सांगितले. Goyathale first in Science Ranjan Competition
