महसुल विभागाने दिली आठ दिवसाची मुदत
गुहागर, ता. 05 : शहर बाजारपेठेतील २८ खोकेधारकांना शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा गुहागर महसुल विभागाने पाठविल्या आहेत. शासकीय जागा खाली करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. महसुल विभागाने दोन वर्षाने या नोटीस पाठविल्या असल्याने खोकेधारकांसमोर पुन्हा एकदा शासकीय कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. Notice of Encroachment in Guhagar


गुहागर शहरातील शहर नाका, श्री व्याडेश्वर मंदिरामागील जागा, गुहागर एस. टी. डेपो व गुहागर ग्रामिण रूग्णालयासमोर असे मिळुन २८ खोकेधारक आहेत. या खोकेधारकांकडून दस्त वसुली केली जाते. मात्र सदर खोके शासकीय जागेत असल्याने विनापरवाना बांधकाम म्हणून गुहागर महसुल विभागाने खोकेधारकांना अतिक्रमण केल्याची नोटीस दिली आहे. सदर अतिक्रमण आठ दिवसाच्या आत हटविण्यात यावीत अन्यथा अतिक्रमण हटविण्यासाठी होणाऱ्या खार्चासहीत वसुली करण्यात येईल असे म्हटले आहे. शहर बाजारपेठ मुळात कमी विस्ताराची बाजारपेठ आहे. अशामध्ये छोटे व्यावसायीक खोके उभारून आपला व्यवसाय करत आहेत. गुहागर झीरो नाक्यापासून राष्ट्रीय महामार्गाचे रूंदिकरण होणार असल्याने यातील बहुतांशी खोके या रूंदिकरणामध्ये उठणार आहेत. Notice of Encroachment in Guhagar


गुहागर शासकीय विश्वामगृह ते गुहागर नाका या दोन किलोमिटर अंतराचे दिड महिन्यापुर्वी संयुक्त मोजणी झाली आहे. संयुक्त मोजणीनंतर कोणाची किती जागा महामार्गासाठी जात आहे. कोणती दुकाने उठणार, शासकीय जागेवर असलेली पुर्वापार दुकाने बाजुला होणार का असे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबीत आहेत. जर ही दुकाने उठत असतील त्यांना इतर ठिकाणी व्यवस्था करून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल का, यावरही ठोस निर्णय नाही. अशामध्येच गुहागर महसुलच्या या नोटीसीने महामार्गाच्या कारवाई अगोदरच महसुलची कारवाई होणार की काय असा सवाल उठत आहे. Notice of Encroachment in Guhagar