गुहागर, ता. 03 : सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे येथे दिनांक ३० एप्रिल रोजी रोजगार कौशल्ये कार्यशाळा संपन्न झाली. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महविद्यालय, वेळणेश्वर व सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली होती. यामध्ये प्राध्यापक श्री. गणेश दिवे यांनी तज्ञ प्रशिक्षक म्हणून विविध प्रात्यक्षिक उपक्रमांद्वारे रोजगार कौशल्यांची माहिती दिली. सह्याद्री तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल शाखेतील तृतीय वर्षातील १०० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. Employment Skills Workshop at Savarde

रोजगाराभिमुख शिक्षण व कौशल्यांचे महत्व लक्षात घेता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरचे संभाषण कौशल्य विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. गणेश दिवे यांनी तज्ञ प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. विविध प्रात्यक्षिकद्वारे रोजगार कौशल्यांचा उलगडा त्यांनी केला. उत्साहवर्धक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या औद्योगिक कंपन्या व त्यामध्ये नोकरीसाठी लागणारेआवश्यक गुण यांची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्यानंतर कार्यशाळेची सुरुवात झाली. Employment Skills Workshop at Savarde

प्रा. दिवे यांनी रोजगारासाठी आवश्यक पत्रव्यवहार करताना घ्यावयाची काळजी- पत्राचा साचा, मजकूर व शब्दांची निवड याबाबत मार्गदर्शन केले. नोकरीकरिता मुलाखतीची संधी उपलब्ध करून देण्यामध्ये रिझ्युमचे महत्व व त्याच्या लिखाणाचे स्वरूप यांची वस्तृत मांडणी करण्यात आली. Employment Skills Workshop at Savarde

मुलाखतीचे कौशल्य विद्यार्थ्यांना समजण्यासाठी प्रात्यक्षिक मुलाखत घेण्यात आली. या सराव मुलाखतीचे विश्लेषण स्वतः विद्यार्थ्यांनीच केले. गटचर्चा सराव म्हणून सहा विद्यार्थ्यांच्या गटास एक असे विषय देण्यात आले. नंतर प्रत्येक गटाने आपल्या चर्चेचा सारांश सर्वांसमोर सादर केला. गटचर्चेमध्ये कौशल्यपूर्ण सहभाग घेण्याच्या तंत्राचा उहापोह करण्यात आला. दैनंदिन जीवन कौशल्ये हीच प्राथमिक रोजगार कौशल्ये आहेत असे यावेळी प्रा. दिवे सांगितले. Employment Skills Workshop at Savarde
कार्यक्रमाचे समन्वयक सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डेचे मेकनिकल विभागप्रमुख प्रा. दिनेश खानविलकर यांनी प्रास्तविक केले, विद्याथी प्रतिनिधी श्री. सैफ यांनी आभार प्रदर्शन केले. सह्याद्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. मंगेश भोसले, महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक र्डॉ. अमितकुमार माने व प्राचार्य श्री. अविनाश पवार यांच विशेष मार्गदर्शन लाभले. Employment Skills Workshop at Savarde
