• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मृत गायीकडे मालकाने फिरवली पाठ

by Manoj Bavdhankar
May 2, 2022
in Guhagar
16 0
0
Cow deadbody found in pit

Cow deadbody found in pit

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतदेह तसाच

गुहागर, ता. 02 : गुहागर पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतावस्थेतील गाय आढळून आली. Cow deadbody found in pit.  सदर गायीच्या मालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. खड्ड्यातून गाय वर काढण्यासाठी जेसीबी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे मृत गाय अजुनही खड्ड्यातच आहे.

Cow deadbody found in pit

सोमवारी दुपारी गुहागर पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात एक गाय पडल्याचे शिक्षण विभागाचे कर्मचारी सुभाष गोयथळे यांच्या लक्षात आले. जवळ जावून पाहिले असता सदर गाय मृतावस्थेत असल्याचे समजले. गाय कोणाची असेल याचा शोध सुरु झाला. गुहागरमध्ये गोपालन करणारे हर्षल बावधनकर यांच्या पंचायत समितीने विचारणा केली. मात्र हर्षल बावधनकर यांनी आपली सर्व जनावरे गोठ्यात असल्याचे सांगितले. गायीचे अधिक निरिक्षण केले असता गायीच्या कानाला टॅगिंग केले असल्याचे लक्षात आले. त्या टॅगिंगवरील क्रमांक पंचायत समितीमधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासला. Cow deadbody found in pit

मृत गायीचा मालक समोर येईना

ही गाय दिलीप पर्शुराम गुरव यांची असल्याची नोंद पशुवैद्यकीय विभागात सापडली. मात्र दिलीप गुरव यांनी, मी ही गाय पाटपन्हाळ्यात विकली होती. असे सांगितले. दिलीप गुरव यांनी दिलेल्या पाटपन्हाळ्यातील व्यक्तीला संपर्क केला असता त्याने सदर गाय माझी नसल्याचे सांगितले. गाय मृत असल्याने मालकी सिद्ध केल्यास शौचखड्ड्यातून तिला बाहेर काढावे लागेल. तिच्या अंत्यसंस्कार करावे लागतील. म्हणून गायीची मालकी सांगण्यास कोणी तयार नसल्याचे समोर आले.

जेसीबी उपलब्ध नाही

मृत गायीचा मालक समोर येत नसल्याने पंचायत समितीने शौचखड्ड्यात पडलेल्या मृत गायीला काढण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणून नगरपंचायतीवर सोपवली. स्वच्छता व आरोग्य सभापती प्रसाद बोले यांनी नगरपंचायतीच्या कामासाठी तत्काळ धावून येणाऱ्या जेसीबी मालकाला फोन केला. मात्र जेसीबी अन्यत्र कामाला असल्याने आज उपलब्ध होऊ शकत नाही. असे जेसीबी मालकाने सांगितले. सभापती प्रसाद बोले यांनी अन्य काही जेसीबी मालकांना फोन केला. मात्र सायंकाळी 7 वाजेपर्यंत जेसीबीची व्यवस्था होवू शकली नाही. त्यामुळे मृत गाय आजही त्या शोषखड्ड्यात पडून आहे.

मृत्यू कशाने उपासमार की उष्माघात

स्थानिकांकडून कळलेल्या माहिती नुसार सदर गाय गेले 30 एप्रिलपासून याच परिसरात फिरत आहे.  पंचायत समितीच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत 1 मे रोजी सकाळी चरताना सर्वेश भावे यांनी पाहिले होते. त्यामुळे 1 मे रोजी दुपारनंतर ही गाय शौचखड्ड्यात पडली असावी असा अंदाज आहे. पंचायत समितीच्या या शौचखड्ड्यावर कडाप्पे आहेत. मात्र एका बाजु जेमतेम उघडी आहे. याच बाजुने गाय खड्ड्यात पडली. गायीला आजुबाजुला हलण्यास जागाही नव्हती. त्यामुळे ही गाय स्वप्रयत्नांनी बाहेर येणे अशक्य होते. 2 मे रोजी दुपारी 3 च्या दरम्यान गाय खड्ड्यात पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे या गायीचा मृत्यू खड्ड्यात पडून झालेला नाही. एकाच स्थितीत अन्नपाण्याशिवाय कडाक्याच्या उन्हात 24 तासांपेक्षा जास्त काळ राहील्याने गायीचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता आहे.

गाय मृत होवून बराचकाळ गेल्याने आता दुर्गंधी पसरु लागली आहे. या वासाने आजुबाजुचे कुत्रे या ठिकाणी फिरु लागेलत. त्यामुळे ही गाय मंगळवारी सकाळी काढण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. मृत गायीची जबाबदारी घेण्यास मालक तयार नाही. नगरपंचायतीकडे जबाबदारी सोपवून पंचायत समिती प्रशासन मोकळे झाले आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील नगरपंचायत प्रशासनाला मृत गाय खड्ड्यातून बाहेर काढून तिच्या अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत.

Tags: Cow deadbody found in pitGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.