आमदार भास्कर जाधव यांचे भेटीत अधिकाऱ्यांचे आश्वासन
गुहागर, ता. 27 : आरजीपीपीएलने (RGPPL) 31 जानेवारीला स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. 26 स्थानिक कर्मचारी बेरोजगार झाले. या कामगारांच्या पाठीशी उभे रहात आरजीपीपीएलमध्ये पुन्हा नोकरी देण्यासाठी आमदार भास्कर जाधव प्रयत्नशील होते. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदारांनी बैठक घेतली. या बैठकीत आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याचे आश्र्वासन दिले आहे. MLA Jadhav meeting with RGPPL Officials
आरजीपीपीएलची (RGPPL) मालकी एनटीपीसीकडे गेल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांना लक्ष्य केले जात होते. स्थानिक कामगारांच्या वाहनांना कंपनीत प्रवेश द्यायचा नाही. कंपनीअंतर्गत असलेल्या पंपातून डिझेल, पेट्रोल द्यायचे नाही. कंपनीद्वारे मिळणाऱ्या सुविधा द्यायच्या नाहीत. कंपनीअंतर्गत होणाऱ्या मनोरंजनात्मक, कौटुंबिक कार्यक्रमात सामावून घ्यायचे नाही. असे कामगार विरोधी निर्णय घेण्यात आले. याच धोरणाचा भाग म्हणून वीज उत्पादन कमी असल्याचे सांगत आरजीपीपीएल व्यवस्थापनाने 31 जानेवारीला 26 स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. हेच धोरण पुढेही कंपनीने अवलंबिले. MLA Jadhav meeting with RGPPL Officials
पहिल्या टप्प्यात बेरोजगार झालेल्या 26 कर्मचाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायांचा पाढा वाचला. त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. कंपनीचे प्रश्र्न सोडविण्यासाठी मदत करेन मात्र स्थानिकांना प्राधान्य दिलेच पाहिजे. अशी आग्रही भुमिका मांडली. त्यांनी विधीमंडळातही आरजीपीपीएलचा प्रश्र्न लावून धरला. MLA Jadhav meeting with RGPPL Officials
दरम्यानच्या काळात फैसल कासकर यांना युनिव्हर्सल टेक्निकल सर्व्हिसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी ही स्वयंरोजगार संस्था निर्माण करण्यास सांगितले. आरजीपीपीएलमध्ये (RGPPL) गेली 15 ते 20 वर्ष अभियंता, तांत्रिक सहाय्यक, कॉम्युटर ऑपरेटर, कार्यालयीन लिपिक आदी पध्दतीने कंत्राटी कर्मचारी असणाऱ्यांना या संस्थेचे सभासद करुन घेण्यात आले. या संस्थेद्वारे आरजीपीपीएलमधील नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी द्यावी. अशी मागणी करण्यात आली. त्याचा पाठपुरावा माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव आणि फैसल कासकर करत होते. MLA Jadhav meeting with RGPPL Officials
याच संदर्भात सोमवारी 26 एप्रिलला आमदार भास्कर जाधव यांनी आरजीपीपीएल प्रकल्पस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरी हाच मुख्य विषय होता. या बैठकीअंती आरजीपीपीएलचे (RGPPL) मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आश्र्वासन आमदार भास्कर जाधव यांना दिले आहे. MLA Jadhav meeting with RGPPL Officials
यावेळी महाव्यवस्थापक हर्बनसिंग बावा, एच आर प्रमुख जॉन फिलिप्स, अपर महाप्रबंधक एस. डी. कुरूप, यूपीएल कंपनीचे प्रमुख चटर्जी, युनिव्हर्सल टेक्निकल सर्व्हिसेस को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन फैसल कासकर, आदी उपस्थित होते. MLA Jadhav meeting with RGPPL Officials