पोलीस अधीक्षक गर्ग, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे
गुहागर, ता. 26 : दिनांक 25/04/2022 रोजी मंडणगड पोलिस ठाणे अंतर्गत म्हाप्रळ चेकपोस्ट (Checkpost) इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन सोहळा पार पडला. हा सोहळा डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी (Superintendent of Police Garg) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. Inauguration of Mhapral Checkpost

इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन सोहळ्यासाठी श्री. शशिकिरण काशिद ,उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड, श्रीमती शैलजा सावंत ,पोलीस निरीक्षक, मंडणगड तसेच मंडणगड पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार, म्हाप्रळ येथील सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थितीत होते. Inauguration of Mhapral Checkpost

म्हाप्रळ चेकपोस्ट हे रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील सागरी सुरक्षा व पोलीस कामकाजाच्या दृष्टीने महत्वाचे चेकपोस्ट असून या चेकपोस्टच्या नूतनीकरणामध्ये मा.पोलीस अधीक्षक यांनी व्यक्तीशः लक्ष देऊन पुढाकार घेतल्याने सदर इमारत नूतनीकरणामध्ये पोलीस कामकाजाच्या दृष्टीने सुसज्ज झालेली आहे. जेणेकरून म्हाप्रळ चेकपोस्ट वरील नेमणुकीचे पोलीस अंमलदार यांनाही त्यांचे दैनंदिन कर्तव्य अधिक सक्षमपणे करण्यासाठी त्याचा सकारात्मक उपयोग होईल. Inauguration of Mhapral Checkpost
