पोलिस अधीक्षक गर्ग ; एहसास उपक्रमाची दिली माहिती
गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व स्तरातील नागरिकांच्या जनजागृतीसाठी दिनांक 25/04/2022 रोजी सकाळी खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर काँलेज येथे तसेच मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय येथे दुपारी डाँ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी (Superintendent of Police Garg) यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी ‘ एहसास ‘ सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी मा.पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली. Use social media safely

सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत डाँ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या संकल्पनेतून सर्व स्तरातील नागरिकांच्या जनजागृतीसाठी ‘ एहसास ‘ ( e – Swachhata Abhiyan For Secure Society ) हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत दिनांक 25/04/2022 रोजी सकाळी खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर काँलेज येथे विद्यार्थ्यांसाठी ‘ एहसास ‘ सेमिनार आयोजित करण्यात आले होते. Use social media safely

तसेच मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय येथे दुपारी डाँ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी ‘ एहसास ‘ सेमिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी मा.पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच असे गुन्हे होऊ नयेत यादृष्टीने कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. इंटरनेटचा तसेच सोशल मिडीयाचा सुरक्षित व योग्य वापर कसा करावा याबाबतही उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या या संदर्भातील अडी-अडचणी समजाऊन घेतल्या व त्यांचे निरसन केले. Use social media safely

या कार्यक्रमासाठी श्री. शशिकिरण काशिद, उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग तसेच खेड आणि मंडणगड पोलीस स्टेशन येथील प्रभारी पोलीस अधिकारी आणि संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. Use social media safely