• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विठ्ठल प्रजातीची रोपे उपलब्ध करुन द्या

by Mayuresh Patnakar
April 23, 2022
in Maharashtra
64 1
0
Provide seedlings of dwarf arecanut Vitthal
126
SHARES
359
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुपारी बागायतदारांची मागणी, लागवडीस अनेकजण उत्सुक

गुहागर, ता. 23 : सुपारी लागवडीसाठी गुहागर तालुक्यातील अनेक शेतकरी उत्सुक आहेत. मात्र वादळ वाऱ्यातही टिकेल, कमी कालावधीत उत्पन्न मिळेल अशी विठ्ठल प्रजातीची रोपे आज रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. शासनाच्या कृषी विभागाने, दापोली कृषी विद्यापीठाने ही रोपे उपलब्ध करुन द्यावीत. अशी मागणी बागायदारांनी केली आहे. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal

कोकणातील नगदी उत्पन्न म्हणून सुपारी लागवड क्षेत्र वाढविण्यास किनारपट्टीवरील अनेक बागायतदार उत्सुक आहेत. मात्र कर्नाटक राज्यात ठेंगणी जात म्हणून विकसीत केलेल्या विठ्ठल प्रजातीची रोपे उपलब्ध होत नाहीत. अशी खंत बागायतदारांनी बोलून दाखवली.

विठ्ठल प्रजातीच्या रोपांचे वैशिष्ट्य म्हणजे ती जास्तीत जास्त 5 ते 6 फुट उंच वाढतात. त्यामुळे सुपारी काढणे, औषध फवारणी सहज शक्य आहे. 3 वर्षांनी उत्पन्न मिळू लागते. झाडांची उंची कमी असल्याने वादळात झाडे मोडत नाहीत. शिवाय वानर, माकडे यांच्या त्रासापासून पिकसंरक्षण सहज शक्य आहे. या जातीचे आयुष्य अवघे 22 ते 25 वर्ष असते. ही एकमेव तोट्याची बाजु आहे. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal

गुहागर वरचापाट येथील ॲड. अद्वैत खरे यांनी सांगितले की, आम्ही प्रयोग म्हणून आसाममधुन कमी उंचीची 50 सुपारीचे रोपांची 6 महिन्यांपूर्वी लागवड केली. तेथील नर्सरीमालकाने रेल्वेने सर्व रोपे चिपळूण पर्यंत पाठवली. प्रवासामुळे रोपांची स्थिती खूप नाजुक होती. पुढील आठवडाभराचा कालावधी या रोपांना ताजेतवाने करण्यात गेला. सुदैवाने सर्व रोपे जगली. परंतू आसामच्या नर्सरीतून गुहागर पर्यंत रोपे आणण्यासाठी  प्रत्येक रोपाला सुमारे 200 रु. खर्च आला. सर्वसामान्य शेतकऱ्याला अशा पध्दतीने रोपे आणणे सहजशक्य नाही. व्यवहार्य ठरणार नाही. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal

Provide seedlings of dwarf arecanut Vitthal

गुहागर तालुक्यातील झोंबडी येथे 5 एकर जागेत कृषी लागवड करणार सागर सोहनी म्हणाले की, जिल्ह्यात फक्त हरचेरीमधील एकाच नर्सरीमध्ये ही रोपे उपलब्ध आहेत. मात्र तेथील शेतकरी म्हणून विकत घेण्यास परवडणार नाही. त्यामुळे आम्ही नाईलाजाने एक एकरात स्थानिक सुपारीची लागवड केली.  Provide seedlings of dwarf arecanut Vitthal

कृषी अभ्यासक मिलिंद गाडगीळ म्हणाले की, परप्रांतातून झाडे विकत घेताना ती  कृषी प्रयोगशाळेत विलगीकरणात ठेवावी लागतात. तेथे त्यांच्यावर औषध फवारणी केली जाते. परप्रांतातील वनस्पती रोगांचा प्रसार होवू नये म्हणून ही काळजी घेतली जाते. मात्र ही व्यवस्था जिल्ह्यात केवळ कृषी विद्यापीठच उपलब्ध करुन देवू शकते. त्यामुळे शासन आणि विद्यापीठाने विठ्ठल जातीची रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. Provide seedlings of dwarf arecanut Vitthal

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarProvide seedlings of dwarf arecanut Vitthalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet32
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.