मोदी सरकारच्या; ६ कोटीहून अधिकांना लाभ – विनय नातू
गुहागर ता. 23 : गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटीहून अधिक महिला, बालकांना झाला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांनी दिली. Benefit of Nutrition Campaign

भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशातील महिलांचे, बालकांचे आणि गर्भवती स्त्रियांची कुपोषणापासून रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पोषण अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत २०१४ मध्ये मिशन इंद्रधनुष सुरु करण्यात आले. या अभियानात मार्च २०२२ पर्यंत ४.१० कोटी बालकांना विविध आजारांवरील लसी देण्यात आल्या आहेत. घटसर्प, डांग्या खोकला (पर्टुसिस), टिटॅनस, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटीस बी या सारख्या गंभीर आजारांवर लस देणे, सर्व लहान मुलांचे तसेच गर्भवती महिलांचे लसीकरण करणे हे ‘मिशन इंद्रधनुष’चे उद्दिष्ट आहे. 352 जिल्ह्यांमध्ये पूर्ण लसीकरण केले जाणार आहे. Benefit of Nutrition Campaign

