१ मे चा मुहूर्त ; प्रवास होणार प्रदूषण मुक्त
गुहागर ता. 23 : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे 6 टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनापासून कोकण रेल्वेच्या मार्गावरील 10 एक्सप्रेस विजेच्या इंजिनावर धावणार आहेत. यामध्ये मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेसचा समावेश आहे. यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त व वेगवान होणार आहे. Konkan Railway to run on electricity
कोकणची भूमी सौंदर्याने नटलेली आहे. हिरवीगार झाडे आणि डोंगर उतारावरील शेती, धबधबे, रानात फुलणारी फुले पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या आदी निसर्ग सौंदर्याचा आनंद कोकण रेल्वेच्या प्रवासात लुटता येतो. कोकणच्या निसर्ग सौंदर्याला डिझेल प्रदुषणाचा डाग लागू नये म्हणून तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे विद्युतीकरणाचा आग्रह धरला. 2015 मध्ये अर्थसंकल्पात निधीची तरतुद केली. Konkan Railway to run on electricity
रोहा ते ठोकूर असा ७०० किलोमीटरचा कोकण रेल्वेचा मार्ग आहे. या पट्टयातील विद्युतीकरणाचे काम २०१५ पासून हाती घेण्यात आले. विद्युतीकरणाचे काम सहा टप्प्यात करण्यात आले. रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम आणि रत्नागिरी ते थिविम असे हे टप्पे होते. या सर्व टप्प्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. Konkan Railway to run on electricity
याआधी मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने कोकण रेल्वेच्या गाड्यांची इंजिन रोह्यात बदलली जात असतं. किंवा डिझेल इंजिन आणि विद्युत इंजिन अशी दोन्ही इंजिने घेवून रेल्वे धावत असत. ही समस्या आता दूर झाली आहे. इंधन बचत, प्रदूषण टाळणे यासह मेल, एक्स्प्रेस गाडीला डिझेल इंजिन जोडण्याच्या कटकटीतून सुटका झाली आहे. Konkan Railway to run on electricity
कोकण रेल्वेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे पासून पहिल्या टप्प्यात दहा गाडया विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विजेचे इंजिन जोडून मंगळुरू सेंटर ते मडगाव पॅसेंजर विशेष, तिरुवंनतपुरम ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेस या गाडया चालवण्यात येणार आहेत. Konkan Railway to run on electricity