• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर नाव द्यावे

by Ganesh Dhanawade
April 23, 2022
in Bharat
18 0
1
Mumbai-Goa highway should be named Balshastri Jambhekar
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

या मागणीसाठी कोकणातील पत्रकार १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदन देणार

गुहागर ता. 23 : मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पत्रकार संघाच्यावतीने १७ मे रोजी तहसिलदारांना निवेदने देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली. Mumbai-Goa highway should be named Balshastri Jambhekar

रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी माणगाव येथे संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषदेचे विभागीय सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, सुनील वाळुंज आदि उपस्थित होते. Mumbai-Goa highway should be named Balshastri Jambhekar

आपल्या भाषणात एस.एम देशमुख म्हणाले की, महामार्ग चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकार आंदोलन करीत होते तेव्हा सारेच शांत होते. मात्र आता रस्त्याचं काम पूर्ण होत आले असल्याने प्रत्येक जण महामार्गाला वेगवेगळी नावं समोर करून पत्रकारांच्या मागणीस खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा महामार्ग केवळ कोकणातील पत्रकारांनी सलग सहा वर्षे लढा दिल्याने होत आहे हे वास्तव सर्वांना माहिती आहे. आणि बाळशास्त्री हे कोकणचे सुपूत्र असल्याने या महामार्गाला त्यांचे नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार आहे. राज्यातील एखादा महामार्ग पत्रकाराच्या नावाने ओळखला जाणार असेल तर त्याला कोणी मोडता घालू नये असे आवाहन देशमुख यांनी केले. १७ मे रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने कोकणातील प्रत्येक तालुक्यातील पत्रकार तहसिलदारांना, जिल्हाधिकारी यांना निवेदनं देऊन महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी करतील. Mumbai-Goa highway should be named Balshastri Jambhekar

एस.एम. देशमुख यांनी आपल्या भाषणात पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील वाढते हल्ले, आणि अधिस्वीकृती समिती तसेच पत्रकारांच्या अन्य प्रश्नांचा धांडोळा घेतला. पेन्शनचे जाचक नियम शिथिल करावेत, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अधिस्वीकृती समितीची पुनर्रचना करावी अशा मागण्या त्यांनी केल्या त्यावर अदिती तटकरे यांनी पत्रकार संघटनांची पुढील महिन्यात बैठक बोलावून पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.  Mumbai-Goa highway should be named Balshastri Jambhekar

अलिबाग येथे सुसज्ज माहिती भवन उभे राहणार असून एक – दीड वर्षात त्याचे काम पूर्ण होणार आहे. अशा प्रकारचे राज्यातील हे पहिलेच माहिती भवन असेल अशी माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली. शहरी भागापेक्षा ग्रामिण भागातील पत्रकारिता ही खरी सजग पत्रकारिता आहे. मात्र आजच्या काळात केवळ पत्रकारिता करून आपले कुटुंब चालविणे अशक्य असल्याने पत्रकारांनी या क्षेत्राशी निगडीत असलेले अन्य कौशल्य जाणून घेणे गरजेचे असल्याचा मौलिक सल्ला ज्येष्ठ माध्यमकर्मीं समीरण वाळवेकर यांनी दिला. Mumbai-Goa highway should be named Balshastri Jambhekar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi Newsmumbai-goa highwayMumbai-Goa highway should be named Balshastri JambhekarNews in GuhagarRaigadratnagiriSindhudurgटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.