आमदार भास्कर जाधव, साखरीआगरमध्ये सभागृहाचे भूमिपूजन
गुहागर, ता. 20 : साखरी आगर जेटीच्या प्रलंबित कामासाठी आमच्याच सरकारमधील मंत्र्याला उलट सुलट प्रश्र्न विचारुन भंडावून सोडले. अखेर नव्याने 8 कोटीचा निधी मंजूर झाला. दिलेला शब्द पाळण्यासाठी मी टोकाची भूमिका घेतो म्हणून मला पक्षांतर्गत सहकाऱ्यांकडून वाईटपणा घ्यावा लागला. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी केले. ते साखरीआगर येथे सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar


साखरीआगर अंजनवाडी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची सभागृहाची मागणी होती. भाजपकडून ती पूर्ण झाली नाही. आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी या सभागृहासाठी 5 लाखाचा निधी दिला. या कामाचे भूमिपूजन आज आमदार जाधव यांनी केले. यावेळी अंजनवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना एका ग्रामस्थ म्हणाले की, गेली 15 वर्ष समाजाचा, गावाचा, शेजारील वाड्यांचा विरोध पत्करत आम्ही एकाच नेत्याच्या बाजुने उभे होतो. मात्र त्यांनी आमचे काम केले नाही. आमदार भास्कर जाधव यांनी केवळ शब्दच दिला नाही तर सभागृहासाठी निधी मंजूर केला. म्हणून अंजनवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आमदार भास्कर जाधव आणि शिवसेनेच्या पाठीशी उभे रहाण्याचा निर्णय घेतला आहे. हाच धागा पकडत आमदार भास्कर जाधव म्हणाले की, गुहागर तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाने विकासाची जाणीव, विकासाबद्दल आस्था आणि प्रेम आहे. त्याचबरोबरच मतांच्या रुपाने परतफेड करण्याची वृत्ती गुहागरकरांच्या जनतेत आहे. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar


या तालुक्यात सर्वात जास्त वजन भाजपचे होते. पण आता भाजपची बहुतांशी मंडळी आमच्यामागे उभी रहात आहेत. कारण आम्ही विकास करतो. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करतो. हा विश्र्वास जनतेमध्ये आहे. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar
आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये मी मतांसाठी कधीच समाजाचे राजकारण केले नाही. समाजासमाजात तेढ निर्माण केली नाही. कोणाला बरे वाटावे म्हणून खोटे बोललो नाही. एखादे काम होणार नसेल तर वाईट वाटेल म्हणून आश्र्वासन दिले नाही. सर्व समाजांनी गुण्यागोविंदाने नांदावे. विकास करणाऱ्याच्या मागे ठामपणे उभे रहावे. ही भूमिका मात्र सातत्याने घेतली. सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कायम सरकारकडे पाठपुरावा करत रहाण्याचे काम करतो. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar


येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर आणि नवनीत ठाकूर यांच्यासोबत आपण माझ्याकडे काम घेवून आलात तेव्हा तुम्ही खरे सांगितलेत. आम्ही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहीलो होतो. तुम्हाला कधीही मतदान केले नाही. माझ्याकडे अनेक जण खोटे बोलतात. मला ते कळते. पण बोलत नाही. तुम्ही मात्र खरे बोललात याचा निश्चित आनंद झाला. त्यावेळी सभागृहाचे काम केले तर सर्वजण माझ्या मागे खंबीरपणे उभे रहाल. अशा शब्दही तुम्ही दिलात. आज सभागृहाचे काम झाले. तुम्हीही पक्षप्रवेश केलात. आता विकास करणाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. तुमची विकासाची कामे करुन घ्या. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar
या कार्यक्रमाला जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, वेळणेश्र्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, विनायक मुळे, उपसभापती सिताराम ठोंबरे, युवासेनेचे सचिन जाधव, यांच्यासह मारुती होडेकर, रवींद्र पवार, महादेव वणे, दत्ताराम निकम, गजानन हेदवकर, दुर्वा पाटील, आंबेरकर, विनायक कांबळे, सिद्धिविनायक जाधव, जयदेव मोरे आदी उपस्थित होते. Bhumipoojan of Community Hall in Sakhari Agar