गुहागर, ता. 15 : शहरातील भंडारी भवन सभागृहात येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, शाखा गुहागरच्या वतीने पेन्शनचा जागर व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण हे होते. यावेळी एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी आपल्या कलागुणांनातून पेन्शनचा जागर केला. यात नाट्य गीत, कविता, एकपात्री, पोवाडा इत्यादीचा समावेश होता.


या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीम. लीना भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. तर तालुक्यातील इतर प्रमुख संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून रक्तदानही केले. जुनी पेन्शन हक्क संघटनेतील एनपीएस धारक तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक इत्यादी कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता. Blood donation camp in Guhagar


या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आलेल्या टीमकडील कीट संपल्याने अनेक इच्छुक रक्तदाते शिल्लक राहिले. यावरून या कार्यक्रमाची यशस्वीता समजते. असे मत तालुका अध्यक्ष अमोल धुमाळ यांनी व्यक्त केले. Blood donation camp in Guhagar


पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि तो घटनेने दिलेला आहे, या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम घेऊन तालुक्यातील एनपीएस धारक कर्मचारी आपला पेन्शन हक्क अधोरेखित केला आहे. कार्यक्रमास राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. Blood donation camp in Guhagar
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ, उपाध्यक्ष प्रदीप पडवाळ, सागर भडंगे, सचिव राहुल आमटे, कार्याध्यक्ष महेश आंधळे, कोषाध्यक्ष ईश्वर घनवटे, राज्य प्रतिनिधी दिपक साबळे, जिल्हा प्रतिनिधी शिवराम अंकुलगे, इमाम पाटील, जिल्हा महिला संघटक पल्लवी काळे, सल्लागार बाबासाहेब राशिनकर, डी.के राठोड,साजीद मुकादम, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर हलगरे, शिवाजी गायकवाड, संपर्क प्रमुख प्रभु हंबर्डे, शारिक अहमद, सहचिटणीस धनंजय डिसले, पांडुरंग फड, गणेश रोडे, जुनैद शेख, महिला प्रतिनिधी निशिगंधा भुते, प्रमुख प्रवक्ते अनिलराजे शिंदे, धनपालसिंग राजपुत, तालुका संघटक अजय खेराडे, भास्कर गावडे, बीट संघटक अवधूत राऊतराव, गणेश डुबे, नितीन खाडिलकर संजय राठोड व संघटनेतील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. Blood donation camp in Guhagar