प्रथमाची वाटचाल उत्तरेकडे, सावनी आणि वनश्री कोकण किनारपट्टी लगत
गुहागर, ता. 13 : कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले. त्यातून मिळणारी माहिती कुतहुल वाढवणारी आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेली रेवा ही स्थलांतरीत (Migratory) असल्याचे निष्पन्न होत आहे. अंडी घालून झाल्यानंतर रेवाचा मुळ स्थानाकडे (native habitat) वेगवान प्रवास (Journey) सुरु आहे. रेवाने आतापर्यंत समुद्रातील सर्वात जास्त अंतर (650 कि.मी.) पार केले आहे. Migratory Rewa’s journey to native habitat

Migratory Rewa’s journey to native habitat
रेवा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रकिना-याला अंडी घालण्यासाठी भेट दिली होती. त्याचवेळी गुहागरच्या मोहिमेतील पहिले सॅटेलाइट टॅगिंग करुन या मादीला रेवा हे नाव देण्यात आले होते. रेवा अंडी घातल्यानंतर एकाच दिशेने प्रवास करत आहे. दक्षिण दिशेला प्रवास करताना तिने ६५० किलोमीटर अंतर पार केले आहे. सध्या ती मंगळूर परिसरात आहे. आतापर्यंत समुद्रातील सर्वात जास्त अंतर कापणारी ऑलिव्ह रिडले कासव ठरली आहे. Migratory Rewa’s journey to native habitat

तिचा हा एकमार्गी प्रवास पाहून भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून येथील शास्त्रज्ञ सुरेशकुमार यांनी गुहागर न्यूजला सांगितले की, रेवा दक्षिणेकडील समुद्रात रहाणारी आहे. तीने केवळ अंडी घालण्यासाठी कोकण किनारपट्टीवर स्थलांतर केले. आता रेवा तिच्या मुळ परिसराकडे जात आहे. परत अंडी घालण्यासाठी ती निश्चित गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर येईल. Migratory Rewa’s journey to native habitat
रेवापाठोपाठ प्रथमाने सर्वात जास्त समुद्रातील अंतर कापले आहे. प्रथमाने आतापर्यंत थेट खोल समुद्राचा रस्ता धरत ५५० किलोमीटर अंतर कापले. प्रथमा सध्या गुजराथ किनारपट्टीवरील वेरावळ समुद्रकिना-यापासून १०० किलोमीटर लांब असल्याचे दिसून आले आहे. वेळास (ता. मंडणगड) मध्ये पहिल्यांदा सॅटेलाईटन टॅगिंग केलेल्या या मादी कासवाला प्रथमा असे नाव देण्यात आले होते. सुरवातीचा महिनाभर प्रथम कोकण किनारपट्टीच्या आसपास फिरत होती. त्यानंतर मात्र .तिचा प्रवास उत्तरेकडे सुरु झाला. आता पावसाळ्यापूर्वी प्रथमा कोठे थांबते हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Migratory Rewa’s journey to native habitat
आंजल्यार्त दुसऱ्या मादी कासवाला सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले. त्या मादीचे नाव सावनी असे ठेवण्यात आले आहे. सावनीने नवी मुंबईपर्यंत प्रवास केला. त्यानंतर ती पुन्हा दक्षिणेकडे येवू लागली. सध्या ती आंजर्ले समुद्रकिना-यापासून १०० किलोमीटर आत आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सॅटेलाईट टॅगिंग केलेली वनश्री सुरुवातीपासूनच समुद्रकिनाऱ्याजवळ घुटमळत आहे. तिचा प्रवासाही धीम्या गतीने होत आहे. सध्या दक्षिणेकडे ती जात असून सिंधुदुर्ग किनारपट्टीपासून १०० किलोमीटर आत दिसून येत आहे. Migratory Rewa’s journey to native habitat