• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणातील मच्छीमार करु लागलेत मत्स्यपूजन

by Mayuresh Patnakar
April 13, 2022
in Travel
17 0
0
Fishermen from Konkan started doing fish worship

खाडीकिनारी मत्स्यपूजन करताना मच्छीमार बांधव

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परंपरा संवर्धनासाठी सागरी सीमा मंचचा पुढाकार

गुहागर, ता. 13 : भगवान विष्णूंच्या दशावतारांमधील पहिला अवतार मत्स्य. हा अवतार भगवान विष्णूंनी चैत्र शु. द्वितीयेला घेतला. आज कोकणातील काही मच्छीमार समाजाच्या वस्तीत मत्स्यजयंतीचे कार्यक्रम होवू लागले आहेत. हे कार्यक्रम होण्यासाठी सागरी सीमा मंच या संस्थेने मच्छीमार समाजात जागृती केली. Fishermen from Konkan started doing fish worship

भगवान विष्णूनी घेतलेल्या दहा अवतारातील प्रभु श्रीराम, गोपाळकृष्ण, भगवान परशुराम, नृसिंह, बुद्ध या अवतारांची जयंती अनेक ठिकाणी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने त्या अवतारातील कार्याची माहिती मिळते. मात्र उर्वरित अवतारांचे उत्सवांची परंपरा कालौघात नाहीशी झाली. सागरी सीमा मंचतर्फे मच्छीमार समाजात मत्स्य जयंतीचा उत्सव पुन्हा रुजविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मत्स्य जयंती  होण्यासाठी सागरी सीमा मंचाने सागरी किनारपट्टीमधील गावात जनजागृती केली. भगवान विष्णूंची मत्स्यवतारातील प्रतिमा उपलब्ध करुन दिली. चैत्र शुध्द द्वितीया ते रामनवमी या कालावधीत उत्सव करण्याचे आवाहन केले. Fishermen from Konkan started doing fish worship

त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात 5 ठिकाणी कार्यक्रम झाले. दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार समाजाच्या सभागृहासमोर होडीत प्रतिमा ठेवून त्याचे पूजन करण्यात आले.  कोळी समाजाचे कारभारी यशवंत पावसे, अमोल पावसे, रमेश पावसे उपस्थित होते.  दाभोळमध्ये होडीत प्रतिमा आणि माशांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मच्छीमार सोसायटीचे संचालक व कारभारी विजय खडपकर व सौ. विशाखा खडपकर यांनी पारंपरिक वेषात पूजन केले.  अनिकेत पालशेतकर यांनी मत्स्यावताराचे महत्त्व सांगितले. गुहागरमधील धोपावे येथील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम झाला.  रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे खारवी समाज परिवर्तन मंच या संस्थेने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम शाळेत घेतला. मुख्याध्यापिका कांबळे, सौ. तनया शिवलकर, राजाराम नाटेकर, बबन आडविरकर, वासुदेव वाघे, ग्रामपंचायत सदस्य सौ. खडपे आदी उपस्थित होते. Fishermen from Konkan started doing fish worship

रत्नागिरीप्रमाणेच मुंबईसह पालघर, वसई, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील काही गावांमध्ये मत्स्यजयंतीचे कार्यक्रम झाले. हे कार्यक्रम होण्यासाठी सागरी सीमा मंचाने जनजागृती केली होती. भगवान विष्णूंची मत्स्यवतारातील प्रतिमा उपलब्ध करुन दिली होती. Fishermen from Konkan started doing fish worship

–  विजय खडपकर, कारभारी, दाभोळ
नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ देवून आम्ही त्याचे आशिर्वाद घेतो. पण माशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असूनही त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा विस्मरणात गेली होती. भगवान विष्णूने मत्स्यावतार घेवून जीवसृष्टी वाचवली. त्याचे पुजनाची परंपरा आम्ही पुन्हा सुरु केली आहे. Fishermen from Konkan started doing fish worship

Tags: Fishermen from Konkan started doing fish worshipGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.