• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मोदी सरकारच्या जल-जीवन अभियानाचे यश

by Ganesh Dhanawade
April 13, 2022
in Bharat
16 0
0
Dr Vinay Natu
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

९. ४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी- जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू

गुहागर, ता. 13 :   घरोघरी नळाद्वारे पाणी पोहचविण्याच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेद्वारे देशातील ९.४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी ते बोलत होते. या योजनेसाठी चालूवर्षीच्या अर्थसंकल्पात ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  The Success of the Water-Life Mission

डॉ. विनय नातू यांनी सांगितले की, मोदी सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाने पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागातील जनतेला विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीतून मुक्त करणे या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली. ९ एप्रिल २२ पर्यंत ९.४० कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जात आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत नळाद्वारे पाणी पूरविल्याजाणाऱ्या घरांची संख्या ३.२३ कोटी इतकी होती. तीन वर्षात ६.१५ कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरविण्यात आले. देशातील १०६ जिल्ह्यांमध्ये आणि १. ४५ लाख गावांमध्ये प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याच्या योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. देशातील दीड लाख गावांतील घरांमध्ये जल जीवन अभियानाची १००टक्के अंमलबजावणी झाली आहे. मोदी सरकारने आता शहरी भागातही ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  The Success of the Water-Life Mission

या योजनेअंतर्गत १७ लाख ३९ हजार शाळा आणि अंगणवाड्यांमध्येही नळाद्वारे पाणी पुरविले जात आहे. या अभियानासाठी ५ वर्षात ३. ६० लाख कोटी एवढी तरतूद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी मैलो न मेल पायपीट करावी लागते. दुर्गम आणि पहाडी भागातील जनतेलाही पाण्यासाठी वणवण करावी लागते. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे पाणी आणण्यासाठीच कष्ट वाचले आहेत. ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९.३१ कोटी एवढी आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असेही डॉ.नातू यांनी नमूद केले. The Success of the Water-Life Mission

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe Success of the Water-Life Missionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.