गुहागर, ता. 13 : श्री हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त पालपेणे कुंभारवाडी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळातर्फे दि. १४ ते १६ एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. Harinam week from 15th in Palpene

या सप्ताहात दि. १४ रोजी रुद्राभिषेक व कळस पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सत्यनारायणाची पूजा हळदी-कुंकू, सामुदायिक भजन, महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. कोयना येथील पुंडलिक देसाई यांचे प्रवचन, ज्ञानोबा तुकाराम जप, सामुदायिक हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन, महाप्रसाद व जागर.
दि. १५ रोजी पहाटे काकडआरती, सकाळी ८ वा. ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी ४ वा. कोल्हापूरचे गजानन गणबावळे यांचे प्रवचन व कीर्तन, रात्री १० वा. पवारसाखरी कुंभारवाडी यांचे भजन.
दि. १६ रोजी सकाळी ५ ते ७ हनुमान जन्मोत्सव कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण सांगता, सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, दिंडी प्रदक्षिणा व रात्री १०.३० वा. मुलांचा व महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम.
दि. २८ रोजी संत गोरोबाकाका पुण्यतिथीनिमित्त पालपेणेचे विष्णूबुवा टेरवरकर यांचे कीर्तन होईल. Harinam week from 15th in Palpene

तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पालपेणे कुंभारवाडी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळातर्फे करण्यात आले आहे. Harinam week from 15th in Palpene
