कुरिअर करण्याच्या बहाण्याने महिलेची ऑनलाईन फसवणूक
गुहागर, ता. 12 : आमच्या कंपनीत कुरियर करण्यासाठी नोंदणी करावी लागते. आम्ही पाठवतो त्या लिंकवर नोंदणी करा. सुरवातीला फक्त दोन रुपये पाठवा. असे सांगून घोळात घेतले आणि ओटीपी आला असला तर सांगा असेही चोरांनी सहज विचारले. अनेकवेळा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीने ओटीपी सांगितला आणि अवघ्या 10 मिनिटात ऑनलाइन चोरांनी सदर इसमाच्या बँक खात्यातून 93 हजार 999 एवढी रक्कम लंपास केली. Online cheating of women


सदर प्रकार शनिवार, ता. 9 एप्रिलला घडला. गुहागर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियाशी संबधीत केसरी विश्वनाथ नागवेकर (वय 43) यांनी याबाबतची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनुसार, हेदवतड येथे आलेल्या केसरी नागवेकर यांच्या पत्नीला पुण्यामध्ये तातडीने कुरीअर करायचे होते. म्हणून त्यांनी गुगल सर्चवर कुरिअर कंपनी शोधली. त्या कंपनीच्या माहितीमध्ये एक मोबाईल क्रमांक सापडला. सदर मोबाईलवर त्यांनी फोन केला. मात्र हा फोन कोणीही उचलला नाही. पाच मिनिटांच्या अवधीत नागवेकर वहिणींना अन्य मोबाईलवरुन फोन आला. तुम्ही कुरिअरची चौकशी करत आहात ना, आमचा तो फोन बंद आहे. असे सांगून मोबाईलवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तींने तुम्हाला कुरिअर करायचे असेल तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. तुमच्या मोबाईवर मी लिंक पाठवत आहे. त्याद्वारे तुम्ही नोंदणी करा. तसेच देवघेवीचा व्यवहार पडताळण्यासाठी फक्त दोन रु. पाठवा. असे सांगितले. Online cheating of women


नागवेकर वहिनींनी आपल्या पतीला ही सर्व गोष्टी सांगितली. लगेच नागवेकर यांनी लिंक उघडली. नोंदणीचा फॉर्म भरत असताना पुन्हा अज्ञात व्यक्तीचा चौकशीसाठी फोन आला. सदर अज्ञात व्यक्तीने गप्पाच्या ओघात 2 रु. पाठविण्यासाठी बँकेतून आलेला ओटीपी विचारला. नागवेकर यांनी अनाहुतपणे ओटीपी दिला. Online cheating of women
त्यानंतर थोड्या वेळाने नागवेकर यांच्या बँक खात्यातून 49 हजार 999/- काढले गेल्याचा संदेश आला. त्यावेळी नागवेकर यांना आपण केलेली चूक आठवली. इतक्यात पुन्हा 44 हजार काढण्याला संदेश आला. एकूण 93 हजार 999/- इतकी रक्कम नागवेकर यांच्या खात्यातून काढण्यात आली होती. Online cheating of women
केसरी नागवेकर यांनी याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात भा. दं. वि. कलम 419, 420 आय.टी. ऍक्टचे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. Online cheating of women