गुहागर, ता. 12 : तालुक्यातील धोपावे गावामध्ये डावलवाडी येथील निर्मला शंकर भुवड यांचे घर काही दिवसांपूर्वी अचानक कोसळल्याने TWJ कंपनी चे सर्वेसर्वा मा. श्री. समीर नार्वेकर सरांनी संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. व ती मदत कार्याध्यक्ष श्री साहिल आरेकर यांनी निर्मला शंकर भुवड यांचे कुटुंबाला सुपूर्त केली. Help through TWJ


डावलवाडी येथील निर्मला शंकर भुवड यांचे घर काही दिवसांपूर्वी अचानक कोसळले होते. त्यानंतर काही ग्रामस्थांनी लोकनेते स्व.सदानंद आरेकर व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. साहिल आरेकर यांच्याशी संपर्क साधून निर्मला भूवड यांच्या घराची व आर्थिक परिस्थितीची माहिती साहिल आरेकर यांनी तत्काळ TWJ कंपनी चे सर्वेसर्वा मा. श्री. समीर नार्वेकर सर यांच्याशी संपर्क साधून सांगितली. आणि संबंधित कुटुंबातील लोकांना मदत मिळण्यासाठी विनंती केली. Help through TWJ


त्यानंतर लगेचच श्री. नार्वेकर सरांनी संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. व ती मदत कार्याध्यक्ष श्री साहिल आरेकर यांनी संबंधित कुटुंबाला सुपूर्त केली. Help through TWJ


यावेळी भंडारी समाज तालुका कमिटी सदस्य श्री. श्रीधर बागकर, श्री. मंदार कचरेकर, श्री. दीपक शिरधनकर, सरपंच श्री. सदानंद पवार, श्री. अनंत डावल, श्री. राजू बेकरे आदी उपस्थित होते. Help through TWJ

