३. १० कोटी पक्की घरे, ३ लाख कोटीहून अधिक अर्थसहाय्य; डॉ. विनय नातू
गुहागर, ता. 12 : मोदी सरकारने गोरगरीबांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात आली. या योजनेतून आजवर देशभरात अडीच कोटी घरे बांधून पूर्ण झाली आहेत. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू (Dr. Vinay Natu) यांनी भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली. Prime Minister’s Housing Scheme
गोरगरीबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ३. १० कोटी पक्की घरे देशभर बांधण्यात आली आहेत. या योजनेसाठी ३ लाख कोटीहून अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ विनय नातू (Dr. Vinay Natu) यांनी दिली. Prime Minister’s Housing Scheme
भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी ते बोलत होते. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत ६ लाख ६८ हजार ३६३ बांधून देण्यात आली आहेत , अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की , देशातील प्रत्येक गोरगरीब माणसाच्या मालकीचे घर असावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली. या योजनेची अंमलबजावणी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात होत आहे. ग्रामीण भागात २. ५२ कोटी घरे बांधून देण्यात आली आहेत तर शहरी आवास योजनेअंतर्गत ५८ लाख पक्की घरे बांधण्यात आली आहेत. ग्रामीण आवास योजनेअंतर्गत १. ९५ लाख कोटी इतके अर्थसहाय्य गरजूना देण्यात आले आहे. शहरी आवास योजनेअंतर्गत १. १८ लाख कोटी इतके अर्थसहाय्य लाभार्थींना देण्यात आले आहे. Prime Minister’s Housing Scheme
गरीब माणसाला हक्काचे घर असले की त्याच्या जीवनाला स्थैर्य मिळून तो आपल्या उत्पन्नवाढीसाठी अधिक जोमाने नवे प्रयत्न करू शकतो, हे ओळखून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेखाली बांधन देण्यात येणाऱ्या घरात उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मोफत दिले जाते, तसेच शौचालय, पाणी पुरवठा , वीज कनेक्शन या सुविधाही दिल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली. Prime Minister’s Housing Scheme