श्रीराम मंदिर, आरे ; प्रमुख भूमिका भरत जाधव
गुहागर, ता. 09 : मधील श्रीराम मंदिर आरे, येथे सालाबादप्रमाणे रामनवमीनिमित्त दि. 10/04/2022 रोजी जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा दुपारी ठिक 12.39 वाजता साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त रविवारी रात्री पालखी नृत्य तर सोमवारी रात्री मोरूची मावशी या नाटकाचे आयोजन केले आहे. तरी या उत्सवाला सर्वांनी अगत्यपूर्वक येऊन आनंद व्दिगुणीत करावा. अशी विनंती, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश जनार्दन भोसले यांनी केले आहे. Drama of ‘Moruchi Mavshi’ at Aare

या रामनवमीनिमित्त रविवारी पहाटे 5.00 वाजता काकड आरती व श्रींची शोड्षोपचारी पूजा करण्यात येईल. सकाळी 11.30 वाजता जन्मकथा पोथी वाचन करून जन्मकाळ, दुपारी 1.00 ते 3.00 महाप्रसाद, सायं. 5.00 ते 6.00 वाजता सिध्दकला भजनी मंडळ गुहागर, वरचापाट यांचे भजन, आणि रात्री 10.00 वाजता श्री पद्मावती पालखी नृत्य मंडळ, मार्गताम्हाणे यांचे पालखी नृत्य सादर करण्यात येणार आहे. Drama of ‘Moruchi Mavshi’ at Aare

तसेच सोमवारी सायंकाळी 4.00 वाजता श्रीराम प्रभूंची रथयात्रा काढण्यात येणार आहे. व रात्री 10.00 वाजता मोरूची मावशी ह्या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकामध्ये प्रमुख भूमिका भरत जाधव साकारणार आहेत. Drama of ‘Moruchi Mavshi’ at Aare

तरी सर्वांनी उपस्थित राहून आनंद व्दिगुणीत करावा. अशी विनंती, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश जनार्दन भोसले यांनी केले आहे. Drama of ‘Moruchi Mavshi’ at Aare
