• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मार्गताम्हाने महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य पदी डॉ. राजश्री कदम

by Guhagar News
April 8, 2022
in Guhagar
17 0
0
Principal Kadam in charge of the college Margtamhane

मार्गताम्हाने महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य पदी डॉ. राजश्री कदम

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवनियुक्त डॉ. कदम यांनी महाविद्यालय विकासात योगदान द्यावे: श्री. मधुकरराव चव्हाण

गुहागर, ता. 08 : डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाने येथील प्राचार्य डॉ. विजय कुमार खोत हे नियत वयोमानाप्रमाणे 31 मार्च 2022 रोजी सेवानिवृत्त झाले असून दिनांक 1 एप्रिल 2022  रोजी डॉ. राजश्री कदम यांची प्रभारी प्राचार्य  नियुक्ती झाल्याबद्दल मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. मधुकररावजी चव्हाण यांनी प्रभारी प्राचार्य डॉ. राजश्री कदम यांना शुभेच्छा देत त्यांनी महाविद्यालयाच्या विकासात अधिकाधिक योगदान द्यावे, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. Principal Kadam in charge of the college Margtamhane

संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुकरराव चव्हाण यांनी डॉ. कदम यांना प्रभारी प्राचार्य पदाचा अधिभार  1 एप्रिल 2022  रोजी प्रदान करीत त्यांना महाविद्यालयाच्या कामकाजात संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील, असा मनोदय व्यक्त करीत महाविद्यालयातील प्रशासनाबरोबरच विद्यार्थी अध्ययन अध्यापन यांबरोबरच अनेक कृतीशील उपक्रमयांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. Principal Kadam in charge of the college Margtamhane

डॉ. राजश्री कदम यांनी आपल्या अध्यापनाचा प्रारंभ महाराष्ट्र कॉलेज, मुंबई सेंट्रल येथे  1987 पासून केला होता. तेथे पाच वर्षे अध्यापनाचे काम केल्यानंतर डॉ. तात्यासाहेब नातू या महाविद्यालयांमध्ये 1998 पासून ते आज पर्यंत मराठी विभाग प्रमुख म्हणून चांगल्या पद्धतीने कार्य पार पाडले आहे. 1998 पासून ते आजपर्यंत 22 वर्ष अध्ययन-अध्यापन करीत महाविद्यालयाच्या विविध समित्यांच्या प्रमुख पदी त्यांनी उत्तमरीत्या काम केले आहे. Principal Kadam in charge of the college Margtamhane

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणान परिषद याचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पार पाडले असून महाविद्यालयास बी प्लस हे मानांकन मिळवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. महाविद्यालयामध्ये नवनवीन उपक्रम सुरू करणारे प्राध्यापिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग महाविद्यालयाच्या विकासामध्ये निश्चितच होणार आहे, यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. Principal Kadam in charge of the college Margtamhane

त्यांनी मुंबई विद्यापीठाची मराठी विषयातील मानाची असणारी विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केली असून मराठी विषया संदर्भात असणाऱ्या बेबीनार मध्ये रिसोर्सपर्सन म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली आहे.  मराठी विषय व या मराठी विषयाच्या संदर्भात असणाऱ्या अनेक संशोधन पर कार्यक्रमांमध्ये तसेच लेखन क्षेत्रामध्ये ही यांचे योगदान फार मोलाचे आहे. मार्गताम्हाने भूमीत जन्मलेले व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. राजश्री कदम या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी विराजमान झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. Principal Kadam in charge of the college Margtamhane

संस्थेचे सर्व पदाधिकारी, वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लकेश्री व त्यांचे सर्व सहकारी, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी डॉ. राजश्री कदम यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत प्राचार्य पदी विराजमान झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार खोत,  डॉ. सुरेश सुतार, डॉ. राजे, डॉ. संगीता काटकर, प्रा. रामचंद्र माने, प्रा. युवराज जाधव, डॉ. डोंगरे, प्रा. विकास मेहंदळे, भरत देवरुखकर, श्रीधर चव्हाण, राजू विचारे असे अनेक जण उपस्थित होते. Principal Kadam in charge of the college Margtamhane

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPrincipal Kadam in charge of the college Margtamhaneटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.