डॉ.नातू महाविद्यालयात ‘परीक्षा पे चर्चा’ चे थेट प्रक्षेपण
गुहागर, ता. 08 : दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे तकलकाटा स्टेडियम, दिल्ली येथून परीक्षा पे चर्चा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतातील 12 लाख विद्यार्थी, 2.71 लाख शिक्षक व 90000 पालकांनी रजिस्ट्रेशन केले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयांमधील (Dr. Tatyasaheb Natu Colleges) स्वर्गीय रुक्मिणी गणपतराव चव्हाण सभागृहांमध्ये दृक-श्राव्य माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. मधुकरराव चव्हाण, प्रभारी प्राचार्य डॉ. राजश्री कदम व माजी प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत उपस्थित होते. The student saw Modi’s program


सध्याचा काळ हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा असल्याने अनेक विद्यार्थी हे परीक्षेच्या या स्थितीचा सामना करीत असताना तणाव व चिंतेने ग्रस्त आहेत. या गोंधळलेल्या स्थितीमध्ये हे विद्यार्थी फार निराश असतात तसेच ते कोणतेही अविचाराने अतिटोकाचे निर्णय घेतात त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचे आहे हे ओळखून आपल्या भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सकाळी 11 वाजता भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी या कार्यक्रमास प्रसार माध्यमाद्वारे जोडले गेले होते या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना ही परीक्षा अंतिम परीक्षा नसून जीवनात अशा अनेक परीक्षा आपणास द्यावे लागतात त्यासाठी निराश न होता आपण सकारात्मक दृष्टीने सक्षम झाले पाहिजे हे त्यांनी उदाहरणाद्वारे पटवून दिले. The student saw Modi’s program


महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमास एकूण 115 विद्यार्थी, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या या कार्यक्रमानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. मधुकरराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून पंतप्रधान पद हे घटनात्मक पद असून त्यांनी या आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमांमधून ही विद्यार्थ्यांसाठी वेळ काढला याबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेले सर्व विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे, या बद्दल त्यांनी आव्हान करत, प्रत्येक विद्यार्थ्याने सकारात्मक दृष्टी ठेवून या सर्व परीक्षेच्या बरोबर जीवनातील परीक्षेसाठी ही तयार राहिले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. केवळ तणाव, चिंतेमुळे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, यासाठी अविरत वनियोजनबद्धकष्ट हे महत्त्वाचे आहेत, हे ही त्यांनी समजावून दिले. परीक्षेचा तणाव व चिंतेमुळे जे विद्यार्थी आत्महत्या करतात हे खरोखरच दुर्दैवी असून विद्यार्थ्यांनी यासारख्या अघोरी मार्गांचा वापर न करता समुपदेशनाच्या माध्यमातून आपले पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधावा हे ही त्यांनी सांगितले. The student saw Modi’s program
या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा. युवराज जाधव, हेमंत चव्हाण, प्रा.चौगुले यांनी पार पाडले. या कार्यक्रमास आय.क्यू. ए.सी समन्वयक डॉ. सुरेशसुतार, प्रा. शिंदे, डॉ.राजे, प्रा.रामचंद्र माने, डॉ. संगीता काटकर, प्रा. गोयथळे, प्रा. भागवत, प्रा. भोसले तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी हे उपस्थित होते. The student saw Modi’s program