एस.टी. कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी 22 एप्रिल अंतिम मुदत
मुंबई, ता. 07 : The ST strike will end? मा. उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) आज दिलेल्या निर्णयानंतर आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST workers) जल्लोष केला. संपकऱ्यांवर कोणतीही कारवाई राज्य सरकारला करता येणार नाही. असे सांगतानाच मा. न्यायालयाने एस.टी. कामगारांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याची सूचनाही केली आहे. मात्र कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी कोर्टाच्या आदेशांचे पत्र आल्यावर, त्याचे वाचन झाल्यावर एस.टी. कर्मचारी निर्णय घेतली असे माध्यमांना सांगितले आहे.
गुरुवार 7 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने वाघ आणि बकरीचा संदर्भ दिला. राज्य सरकार हे वाघाप्रमाणे शक्तीशाली असते त्यामुळे बकरीचं संरक्षण करणं हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. अशी टीप्पणी न्यायालयाने केली. यावेळी एस.टी. महामंडळाने संपकऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. संपकरी कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युईटी, पीएफ देण्यात यावा. अशा सूचना न्यायालयाने केल्या. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी 22 एप्रिल ही अंतिम मुदत दिली आहे. The ST strike will end?
याबाबत माध्यमांशी बोलताना एस.टी.कर्मचाऱ्यांचे वकील सदारत्न गुणवर्ते म्हणाले की, सुनावणी दरम्यान मा. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत जे निर्णय दिले, शासनाला ज्या सुचना दिल्या त्या निर्णयाची प्रत येण्यापर्यंत आम्ही थांबणार आहोत. निकालाची प्रत मिळाल्यावर वाचली जाईल. त्यातील मुद्दे कामगारांसमोर ठेवले जातील. त्यानंतर हजर होण्याबाबतचा निर्णय कर्मचारी घेतली. महाराष्ट्रातल्या सर्व आगारात एकाच दिवशी, एकाच वेळी एस.टी. कर्मचारी हजर होतील. The ST strike will end?
या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना परिवहन मंत्री ॲड. अनिल परब म्हणाले की, आजपर्यंत 7 वेळा कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची विनंती आम्ही केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांप्रमाणे कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावे. कामगारांवरच्या सर्व कारवाया मागे घेतल्या जातील. ज्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची चौकशी पोलीस करतील. पण परिवहन मंडळ त्या कामगारांना कामावर घेईल. गेले पाच महिने एस.टी. बंद असल्याने महामंडळ, संपकरी कर्मचारी आणि जनता सर्वांचेच नुकसान झाले आहे. The ST strike will end?