रिगल महाविद्यालयाचे उद्घाटन आणि क्रिक्रेट स्पर्धेला भेट
गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) मंगळवारी 5 एप्रिलला गुहागरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात शृंगारतळीमध्ये महाविद्यालयाचे उद्घाटन ते करतील. त्यानंतर गुहागर आरेपुल येथे भंडारी प्रिमियर लीग या स्पर्धेला ते सदिच्छा भेट देणार आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधवही (MLA Bhaskar Jadhav) या दोन्ही कार्यक्रमांना मंत्री सामंत यांच्याबरोबर उपस्थित रहाणार आहेत. Education Minister Samant Guhagarat


गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रिगल एज्युकेशन सोसासायटीचे रिगल कॉलेज सुरु होत आहे. हॉटेल व्यवस्थापन, नर्सिंग, एमबीए, असे व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षण देणारे हे गुहागर तालुक्यातील पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे उद्घाटन : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत करणार आहेत. मंगळवारी 5 एप्रिलला दुपारी 2 वा हा कार्यक्रम होणार आहे. Education Minister Samant Guhagarat


गुहागर तालुका भंडारी समाजच्या युवक समितीतर्फे गुहागर तालुक्यातील भंडारी ज्ञाती मर्यादित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 3 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत या स्पर्धा आरेपुल येथे तयार करण्यात आलेल्या मैदानावर होत आहेत. 5 एप्रिलला शृंगारतळीमधील कार्यक्रम संपल्यावर उदय सामंत या स्पर्धांना भेट देणार आहेत. Education Minister Samant Guhagarat