• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा शुभारंभ

by Ganesh Dhanawade
April 4, 2022
in Guhagar
18 0
0
Launch of Jay Bhandari Cricket Tournament

जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा शुभारंभ

35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका भंडारी समाज आयोजित; 16 संघ सहभागी

गुहागर, ता. 04 : तालुका भंडारी समाज आयोजित जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२२ भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेला गुहागर आरेपूल येथील क्रिकेट मैदानावर शानदार सुरूवात झाली, असून या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्य नेत्रा ठाकूर (Zilla Parishad member Netra Thakur) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. Launch of Jay Bhandari Cricket Tournament

या स्पर्धा चार दिवस खेळविल्या जाणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. या क्रिकेट प्रीमियर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ५५ हजार ५५५ रुपये व चषक, तसेच द्वितीय क्रमांकास ३३ हजार ३३३ रुपये व चषक व अन्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. Launch of Jay Bhandari Cricket Tournament

Launch of Jay Bhandari Cricket Tournament
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले

यावेळी गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष राजेश बेंडल (Mayor Rajesh Bendal), गुहागर नगरपंचायतीच्या शिक्षण सभापती सुजाता बागकर (Education Speaker Sujata Bagkar), अमोल वराडकर, प्रमोद भोसले, बंडू गडदे, मोहन बागकर, आरे गावचे सरपंच श्रीकांत महाजन, निलेश मोरे, रमेश देवकर, प्रमोद पोळेकर, सचिन जाधव, टी. डब्लू. जे. संचालक स्वप्नील नार्वेकर, मुरलीधर बागकर, पद्माकर भोसले, निलेश मोरे, ऋषी तवसाळकर, दीपक शिलधनकर, श्रीधर बागकर, सतीश शेटे, हेमचंद्र आरेकर, दीपक कनगुटकर , प्रदीप सुर्वे आदी उपस्थित होते. Launch of Jay Bhandari Cricket Tournament

या स्पर्धेमध्ये गुहागर तालुका भंडारी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मास्टर अविनाश नरवण (संघ मालक – सचिन जाधव), जी. एस.के. फायटर (संघ मालक – कार्तिक कनझुनकर, हमरेश कनझुनकर), गुहागर फायटर्स (संघ मालक – राकेश साखरकर ), टी.डब्लू. जे.गुहागर (संघ मालक – स्वप्निल नार्वेकर) , डी. एन. लायन्स (संघ मालक – निलेश अनंत मोरे), श्रीराम डेव्हलपर (संघ मालक –  दशरथ भोसले, खोत), बाळू इलेव्हन (संघ मालक – धनजय बागकर), भूमी वॉरियर्स ( संघ मालक- संतोष गोयथले), जे. डी. फायटरस (संघ मालक -जयदेव मोरे, दीपक कनगुटकर), कल्पवृक्ष इलेव्हन (संघ मालक – निलेश सुर्वे) आर्य इलेव्हन ( संघ मालक – निलेश मोरे), प्रतीक इलेव्हन (संघ मालक – प्रतीक ठाकूर) एस. डी . इलेव्हन ( संघ मालक – श्रीधर बागकर, दीपक शिलधनकर), स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान (संघ मालक – साहिल आरेकर, मंदार कचरेकर , सिद्धेश आरेकर ) आर. के. डी. वॉरियर्स (संघ मालक – सागर मोरे, अनिकेत भोसले, मयुरेश पावसकर ) समर्थ कृपा इलेव्हन (संघ मालक –  ऋषिकेश तवसालकर) आदी संघ सहभागी झाले आहेत. Launch of Jay Bhandari Cricket Tournament

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLaunch of Jay Bhandari Cricket TournamentMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.