चेअरमनपदी रामचंद्र हुमणे तर व्हा. चेअरमनपदी तुकाराम निवाते
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकॎरी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रामचंद्र रत्नू हुमणे (गुरुजी), तर व्हा. चेअरमनपदी श्री. तुकाराम बाबाजी निवाते यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सर्व संचालक मंडळही बिनविरोध निवडून आल्याने कुणबी पतसंस्थेच्या गेल्या २१ वर्षाची बिनविरोध निवडणूकीची व “अ” वर्गाची परंपरा कायम राखली आहे. Unopposed selection of Kunbi Patsanstha
गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली, तालुका गुहागर या पतसंस्थेच्या मंजूर प्रचलीत उपविधी मधील तरतूदी नुसार तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा मंगळवारी उत्साहात संपन्न झाली. Unopposed selection of Kunbi Patsanstha
यावेळी पतसंस्थेच्या २०२१-२०२२ ते २०२६ -२०२७ या कालावधी करीता नवनिर्वाचित चेअरमन रामचंद्र हुमणे, व्हा. चेअरमन तुकाराम निवाते यांचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. के. एम. देवरुखकर, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामिण शाखा अध्यक्ष व पतसंस्थेचे सल्लागार श्री. कृष्णा वणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संचालक पदी गुहागर तालुक्यातील आंबेरेखुर्द येथील सर्वसाधारण मधून श्री. पांडूरंग गणपत पाते, पालपेणे तळ्याचीवाडी येथील वैभव सदाशिव आदवडे, गुहागर येथील प्रदिप गोविंद बेंडल, कोळवली येथील अमोल शांताराम वाघे, कोतळूक येथील उदय सखाराम गोरीवले, अनुसूचित जाती /जमाती मधून आबलोली येथील संदेश तुकाराम कदम, सडे जांभारी येथील महिला प्रतिनीधी श्रीम. वनिता पांडूरंग डिंगणकर, आबलोली येथील महिला प्रतिनीधी सौ. श्रावणी अनिकेत पागडे, हेदवी मधील इतर मागासवर्गीय मधून महादेव विश्राम वणे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. Unopposed selection of Kunbi Patsanstha
यावेळी आबलोली पतसंस्थेचे सचिव अनिल घाणेकर, शृंगारतळी शाखेचे लिपीक वैभव बागवे, आबलोली शाखेचे लिपीक संतोष हुमणे, मदतनीस संजय खापले, सुलक्षणा भूवड आदी उपस्थीत होते. Unopposed selection of Kunbi Patsanstha