डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय ; प्रमुख वक्ते-डॉ. उर्विक कुमार बी. पटेल
गुहागर, ता. 31 : सोमवार दि. २८ मार्च २०२२ रोजी एजुकेशन सोसायटी, मार्गताम्हाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने.( Dr. Tatyasaheb Natu College) येथे इतिहास व राज्यशास्त्र विभाग वतीने राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्या वेबिनारसाठी प्रमुख वक्ते –म्हणून डॉ. उर्विक कुमार बी. पटेल उपस्थित होते. National Webinar at Margatamhane College


डॉ. उर्विक कुमार बी. पटेल (Dr. Urvik Kumar B. Patel) सह. प्राध्यापक इतिहास विभाग प्रमुख गव्हर्मेंट आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज काच्छल ता. महुवा, जि. सुरत, गुजरात. त्यांनी”शहीद भगतसिंग जी का स्वतंत्रता संग्राम मे योगदान.” विषयावर बोलताना भगतसिंग यांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी, भूमिका स्पष्ट करून त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा आढावा घेतला. भगतसिंग राष्ट्रीय पातळीवर नेते असल्याचे मत मांडत असताना मार्गताम्हाणे एजुकेशन सोसायटी व डॉ तात्यासाहेब नातू महाविद्यालयाच्या (Dr. Tatyasaheb Natu College) उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल असा विश्वास व्यक्त केला. National Webinar at Margatamhane College


सोमवार दि. २८ मार्च २०२२ रोजी आयोजित केलेल्या वेबिनारचे प्रस्ताविक डॉ. नामदेव डोंगरे यांनी केले. वक्ता परिचय करताना डॉ सत्येंद्र राजे यांनी महाराष्ट्र व गुजरात हे भाऊ असून परस्पर सहकार्याने कार्यक्रम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा विकास मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानले. National Webinar at Margatamhane College

