गुहागर, ता. 30 : पंचायत समितीच्या सेस अंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी मधून तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे दिव्यांग व्यक्तींचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने गुहागर पंचायत समितीच्या वतीने उपस्थित सर्वांचे सुपारीचे रोपटे देऊन सत्कार केला. Online Disability Certification Camp


या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी या शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय येथे जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत होता. परंतु, पंचायत समितीच्या पाच टक्के निधीतून दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी या ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व दिव्यांगाना याचा लाभ मिळणार आहे. Online Disability Certification Camp


गुहागर तालुका पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी सांगितले की, दिव्यांगाना प्रमाणपत्रासाठी रत्नागिरी मध्ये लांबच्या अंतरावर जावे लागत होते. यासाठी दिव्यागांच्या राखीव पाच टक्के निधी मधून तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. या शिबिराचा लाभ दिव्यांगानी घ्यायचा आहे. Online Disability Certification Camp
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले (Group Development Officer Amol Bhosale) यांनी दिव्यांग शिबिराची माहिती दिली. तसेच शिबिर योग्य प्रकारे राबवले जाणार असून त्यासाठी जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी, पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय गुहागर तसेच सर्व पंचायत समितीतील कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुंभरे, अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल जाधव, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, नेत्ररोग तज्ञ डॉ. कानगुले, मनोविकार तज्ञ डॉ. समिक्षा जाधव, भौतिकोपचार तज्ञ डॉ. नितीन चौके, भौतिकोपचार तज्ञ डॉ. गौरव पाटील, बाल रोग तज्ञ डॉ. बळवंत, डॉ. शशांक ढेरे, डॉ. पूजा जाधव, डॉ. गीते, डॉ. कऱ्हे, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, रुग्ण कल्याण समिती सदस्य राकेश साखरकर, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, तालुका पंचायत समिती गुहागर आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले. Online Disability Certification Camp

