संपापूर्वी 19,397 मार्गावर धावणारी लालपरी सद्या केवळ 1, 774 मार्गावर धावते
गुहागर, ता. 28 : सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेल्या ग्रामीण नागरीकांची जीवनवाहीनी असलेल्या लालपरिची चाके मागील चार महिण्यात थांबली आहेत. संपाच्या चार महिण्याच्या काळात गाव तिथे एसटी अशी ओळख धूसर होत आहे. संपापूर्वी राज्यात 19 हजार 397 मार्गावर लालपरी धावत होती. सद्यस्थितीत केवळ 1 हजार 774 मार्गावर लालपरी धावत आहे. एसटी पूर्ण क्षमतेने धावत नसल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ST is still stalled

सर्वसामान्यांची जीवनवाहीनी महाराष्ट्र परिवहन मंडळाची एसटी सध्या खेड्यापाड्या पर्यंत पोहोचत नाही. 1 हजार 774 मार्गावर धावत असून यातून दररोज 7 कोटींचे उत्पन्न मिळत आहे. मात्र मागील चार महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या संपामूऴे एसटीची चाके थांबली आहेत. लालपरी थांबल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गावातील नागरिकांना एसटीशवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एसटीची सेवा अशीच बंद राहिली. तर सर्वसामान्यांचा एसटीवरील विश्वास कमी होऊन खाजगी वाहनांकडे प्रवाशी वळतील. ST is still stalled

परिवहनचे दुसरे साधन नसल्याने शाऴेतील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच गावकरी लालपरिची आतुरतेने वाट पाहतात. मात्र मागील चार महिन्यापासून एसटी गावापर्यत पोहोचली नाही. केवळ प्रमुख मार्गावर एसटी धावत आहे. संपापूर्वीची स्थिती वेगळी होती. त्यावेळी गावापर्यत एसटी पोचत होती. आज मात्र स्थिती बदललेली आहे. मात्र महामंडळाला वाढत्या डिझेलचे दर पाहता मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्यामुळे उत्पन्नपेक्षा खर्चच अधिक करावा लागत आहे. ST is still stalled
18,000 – संपापूर्वी धावणाऱ्या बस
19397 – संपापूर्वी सुरू असलेले मार्ग
22 कोटी – संपापूर्वी मिळणारे उत्पन्न
17623 – बंद असलेले मार्ग
चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटीची चाकेच डेपोमध्ये रूतून बसली आहेत. संपापूर्वी एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने होत होती. मात्र, संपापासून पुन्हा मोजक्याच मार्गावर एसटी धावत आहे. त्यांमुळे महामंडळ आगामी काळात एसटीचे उत्पन्न वाढविण्याचे नियोजन करीत आहे. – सुहास जाधव वाहतूक व्यवस्थापक ST is still stalled

