आशा दिनानिमित्त नृत्य, गायन, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांचे आयोजन
गुहागर, ता. 24 : तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तक उपस्थित होत्या. Asha Day Celebrate in Guhagar


आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांच्यासाठी नृत्य, गायन, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच तालुक्यात कोरोना काळात उत्तम कामाबद्दल, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत उत्तम कामाबद्दल, लसीकरण मोहीमेत उत्तम कामाबद्दल आशांचं पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनःश्याम जांगिड, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी देसाई उपस्थित होत्या. Asha Day Celebrate in Guhagar
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी तालुका लेखापाल सचिन चौगुले, गट समन्वयक श्रध्दा पवार, तालुका आरोग्य सहाय्यक मुद्दमवार यांनी नियोजन व प्रयत्न केले. तसेच पुरुष परिचर श्री. कोळी व पवार यांनी अल्पोहार, पाणी व इतर कामासाठी परिश्रम घेतले. Asha Day Celebrate in Guhagar
आशा दिवस कार्यक्रमात आशा सेविकांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये समूह नृत्य स्पर्धेत हेदवी प्रा. आ. केंद्र विजयी, रांगोळी स्पर्धेत तळवली प्रा. आ. केंद्र विजयी, गायन – कविता स्पर्धेत श्रीम. विंदा, जाधव, (आशा स्वंयसेवीका चिखली प्रा. आ. केंद्र), प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजया विजय शिंदे (आशा स्वयसेविका तळवली प्रा. आ. केंद्र ), तसेच कोविड १९ (कोरोना) कालावधीत कर्तव्य भावनेने वाडी-वस्तीत जाऊन रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना उत्तम सेवा देऊन मदत केली. त्याबद्दल त्यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून आशा स्वंयसेवीका अमृता अंकुश जानवळकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. Asha Day Celebrate in Guhagar

