गुहागर, दि.16 : शृंगारतळी पोस्ट ऑफिसमधून (Sringartali Post Office) आधार सेवा (Aadhaar Services), वेस्टर्न युनियन मनिट्रान्सफर (Western Union Money Transfer), सुकन्या समृध्दी खाते (Sukanya Samrudhi Account), तसेच सर्व प्रकारचे नविन खाते (New account) या सुविधा खातेधारकांना वेळीच आणि चांगल्या प्रकारे पुरविल्या जातात. यासाठी शृंगारतळी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. Pride Ceremony of Sringartali Post Office


हा सत्कार समारंभ दि. 15.03.2022 रोजी चिपळूण ब्राम्हण सहाय्यक सभागृह येथे पार पडला. यामध्ये पोस्ट ऑफीस कर्मचारी यांना बक्षीस वितरण व गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम मा. डाकघर अधिक्षक श्री. ए. बी. कोड्डा, मा. सहाय्यक डाकघर अधिक्षक रत्नागिरी, सहाय्यक डाकघर अधिक्षक चिपळूण, डाकघर निरिक्षक श्री. योगेश जाधव गुहागर यांचे उपस्थितीत पार पडला. Pride Ceremony of Sringartali Post Office
यावेळी शृंगारतळी पोस्ट ऑफिसला चार प्रथम क्रमांकाची बक्षीस देण्यात आली. आधार सेवा, वेस्टर्न युनियन मनिट्रान्सफर, सुकन्या समृध्दी खाते, तसेच सर्व प्रकारचे नविन खाते (Aadhaar Services, Western Union Money Transfer, Sukanya Samrudhi Account, New account,) यांचा समावेश आहे. अशी माहिती शृंगारतळीचे पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर ए.पी. रावळकर यांनी दिली. तसेच काही वेळा नेटवर्क नसल्यामुळे सेवा देण्यास वेळ लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. Pride Ceremony of Sringartali Post Office

