गुहागर, दि.15 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय (Khare-Dhere-Bhosle College) सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या सयुंक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. दि.२८.०२.२०२२ रोजी सर सि.व्ही.रमण यांचे संशोधनातील अमूल्य योगदान यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय विज्ञान दिवस महाविद्यालयात सुद्धा अत्यंत उत्साहात साजरा करण्या आला. Science Day in Guhagar College


दि.२८.०२.२०२२ रोजी विद्यार्थ्यांनी “शास्त्रज्ञ आणि संशोधन”या विषयावर अत्यंत रंजक अशा गोष्टी सांगितल्या तसेच कार्यक्रमाला कथाकथनाचे स्वरूप दिले. विद्यार्थ्यांनी लुईस पाथर, जगदीशचंद्र बोस, आयुर्वेदाचे शस्त्रक्रियेतील योगदान, सुक्ष्मजीवशास्त्रामध्ये असणारे भारतीय वैज्ञानिकांचे योगदान, भारतातील विकासात विज्ञानाचे महत्व अशा अत्यंत महत्वाच्या विषयांवर सर्व समावेशक चर्चा केल्या. Science Day in Guhagar College


दि.०२.०३.२०२२ रोजी सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑंन द स्पॉट निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान व स्रियांचे सशक्तीकरण, वैश्विक शांतता आणि विज्ञान, हवामान बदल, मानवता, विज्ञानातील नोकरीच्या संधी इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ निंबंध लिहिले. Science Day in Guhagar College


राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्रा.डॉ.ए.व्ही.सावंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.जि.बी.सानप, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एन.एस.भालेराव, प्रा.एस.व्ही.जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती. Science Day in Guhagar College


महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विज्ञान विषय आणि विज्ञानाची रोज बदलत जाणारी भूमिका तसेच विदयापीठ आणि महाविद्यालय स्तरावर कालसुसंगत झालेले विद्यार्थीनुरूप बदल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रा.जि.बी.सानप यांनी जैविकखते, जैविक किटकनाशक, जैवशास्त्र, औषध क्षेत्र यामध्ये असणारे विज्ञानाचे महत्व सर सि.व्ही.रमण यांचे संशोधनातील भारताला, जगाला दिलेले योगदान यावर यावर मत व्यक्त केले. Science Day in Guhagar College


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील एम.के.बोले, रवींद्र कळझुणकर यांचे सहकार्य लाभले. प्रा.एस.व्ही.जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. Science Day in Guhagar College

