जिल्हा प्रमुख सचिन कदम : नाव न घेता सुनावले खडे बोल
गुहागर, दि.14 : शिवसेनेच्या काही महाभागांना जिल्हा परिषदेत पद मिळाल्यावर आमदार झाल्यासारखे वाटते. त्याच्या या वृत्तीमुळे संघटनेचे नुकसान झाले. फुट पडली. अशा सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेल्या कर्तृत्वशुन्य सदस्यांचे कार्य अहवाल काढले तर संधीची माती झाली असे म्हणावे लागले असते. तेव्हा आगामी निवडणुकीतील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी प्रथम हा कार्यअहवाल वाचावा. असे खडे बोल जिल्हा प्रमुख सचिन कदम (District Head Sachin Kadam) यांनी नाव न घेता सुनावले. Stict Instructions of District Head Sachin Kadam
पालपेणे येथील भवानी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव (Z. P. President Vikrant Jadhav) यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदमांचे (District Head Sachin Kadam)आक्रमक रुप सर्वांना पहायला मिळाले. ते म्हणाले की, सत्तेचे पद मिळाल्यावर काहींच्या डोक्यात हवा शिरते. असे लोकप्रतिनिधी नंतर मतदासंघात फिरकतही नाहीत. मग पदाधिकाऱ्यांबरोबर सहकाऱ्यांबरोबर वाद होतात. गट तटाच्या राजकारणातून संघटनेचे नुकसान होते. या पार्श्र्वभुमीवर विक्रांत जाधव यांनी कार्य अहवालातून अनेक गोष्टी शिकता येतील. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका यांच्या निवडणुका एकत्र होणार आहेत. विक्रांतदादांचा आदर्श घेवून ज्यांना हे झेपणार आहे त्यांनीच उमेदवारीसाठी पुढे यावे. कुटुंब वाढलयं. घर भरलंय. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढु शकते म्हणून हा सल्ला आहे. Stict Instructions of District Head Sachin Kadam
शिवसैनिकांनी आत्तापासून कामाला लागावे. शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याची सर्वांनी चिंता करुया. उमेदवार कोण आहे, आघाडी होणार की नाही. या गोष्टी वरिष्ठांवर सोडून देवू. भाजपा (BJP) हा आपला क्रमांक एकचा शत्रु आहे हे धान्यात ठेवा. चार राज्यात आधीच भाजप होता. त्यांच्या आमदारांची संख्या कमी झाली हे कोणी सांगत नाही. काँग्रेस (Congress) बरी होती असे म्हणण्याची वेळ आली आहे. मराठी माणसाला धोका देणारी भाजप संपविण्याची गरज आहे. त्यामुळे याठिकाणी जी थोडीफार भाजप शिल्लक आहे ती संपण्यासाठी कामाला लागा. असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केले. Stict Instructions of District Head Sachin Kadam
या प्रकाश सोहळ्याला आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav), सौ. सुवर्णा जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव (Z. P. President Vikrant Jadhav), माजी अध्यक्ष रोहन बने, गुहागर विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, गुहागर पंचायत समितीचे सर्व सदस्य, राजेंद्र महाडिक, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत आदी शिवसेना, युवा सेनाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. Stict Instructions of District Head Sachin Kadam