गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकाल उमेश सुभाष भाटकर यांनी जाहीर केला. 13 जणांच्या संचालक मंडळापैकी राखीव विमुक्त जाती, भटक्या जमातीचे पद रिक्त आहे. तर दोन महिला प्रतिनिधी बिनविरोध निवडून आल्या आहेत. Sheer Society results announced


निवडणुक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीनंतर जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी म्हणून बलवंत लक्ष्मण ठोंबरे, नयन गजानन गुरव, शंकर गुणाजी फटकरे, लक्ष्मण बाळकृष्ण आंबेकर, शंकर महादेव आंबेकर, शिवराम हरी आंबेकर (सर्व रहाणार शीर), मनोज मोरेश्र्वर निमकर रा. चिंद्रावळे आणि मंगेश विश्राम मास्कर रा. मासू हे 8 संचालक निवडून आले आहेत. राखीव अनुसुचित जाती जमाती मतदारसंघातून अनंत विठ्ठल पवार, रा .शीर आणि राखीव इतर मागास वर्ग मतदार संघातून विजय सोनू मसुरकर हे निवडून आले आहेत. राखीव महिला प्रतिनिधी म्हणून सुमिता दत्ताराम मते आणि सविता चंद्रकात सलपे (दोन्ही रा. शीर) यांची बिनविरोध निवड झाली आहे. Sheer Society results announced
सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदारसंघात 8 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. चंद्रमणी राघो जाधव (73 मते) , तुषार सुभाष बेर्डे (81 मते) आणि बाळकृष्ण गुणाजी शिर्के (109 मते) या तीन उमेदवारांचा पराभव झाला. 75 मते अवैध ठरली. Sheer Society results announced
राखीव अनुसुचित जाती जमाती मतदार संघातील 1 जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात होते. अनंत पवार (मते 365) यांनी चंद्रकात गोपाळ पवार (मते 138) यांचा पराभव केला. राखीव इतर मागास मतदारसंघातही 1 जागेसाठी 2 उमेदवारांमध्ये लढत झाली. विजय सोनू मसुरकर (मते 407) यांनी अंकुश पांडुरंग अलिम (मते 105) यांचा पराभव केला. Sheer Society results announced

