ह.भ.प. कैलास खरे मांडणार क्रांतिकारक
गुहागर, दि. 04 : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलतर्फे सुरू असलेल्या क्रांतिकारकांवरील कीर्तन मालिकेत दि. ५ व ६ मार्च रोजी वरच्या आळीत (सुभाष पथ) येथील अध्यात्म मंदिरात कीर्तने होतील. यावेळी कीर्तनकार हभप कैलास खरे कीर्तने करणार आहेत. तरी सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत त्यांचा लाभ घ्यावा. असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि अखिल भारतीय कीर्तन कुलातर्फे करण्यात आले आहे. दि. ५ मार्च रोजी येसाजी कंक, दि. ६ मार्च रोजी खंडो बल्लाळ यांच्याविषयीची कीर्तने सादर होतील. Kirtan at Ratnagiri Spirituality Temple
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेली ही कीर्तनमालिका येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. कैलास खरे यांनी २०१० पासून कीर्तनसेवा चालू केली. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड, हैद्राबाद, ग्वालियर, भोपाळ, इंदौर (Maharashtra, Goa, Gujarat, Chhattisgarh, Hyderabad, Gwalior, Bhopal, Indore) इत्यादी ठिकाणी मिळून ५०० हून अधिक कीर्तने केली आहेत. Kirtan at Ratnagiri Spirituality Temple
सध्या कीर्तनाचे मार्गदर्शन डोंबिवली येथील कीर्तनकार हभप आनंदबुवा जोशी यांच्याकडे चालू आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफिलीही केल्या आहेत. संगीत नाटकातही भूमिका साकारली आहे. गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण डोंबिवली येथील ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. किरण फाटक गुरुजी यांच्याकडे सुरू आहे. त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद सर्वांनी घेण्याचे आवाहन केले आहे. Kirtan at Ratnagiri Spirituality Temple