मार्गदर्शक सचिन कारेकर; पाच वर्षे लागवड प्रशिक्षण शिबिरातून तब्बल 300 हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
गुहागर, दि. 01 : तालुक्यातील गारवा कृषी पर्यटन केंद्र, आबलोली (Garwa Agri-Tourism Center, Aabaloli) येथे व्यावसायिक हळद लागवड प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. Turmeric Cultivation Training in Aabaloli

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन सचिन कारेकर म्हणाले की, गेले अनेक वर्षे मी हळद लागवड करत आहे. गेली काही वर्षे नुसत्या लागवडीवर न थांबता यातून नाविन्यपूर्ण संशोधन करून उत्पादन अधिकाधिक कसे वाढेल यावर प्रयोग चालू आहेत. यातूनच आपली स्वतःची एस. के. -4 (स्पेशल कोकण-4) हळद प्रजाती तयार केली आहे. Turmeric Cultivation Training in Aabaloli
यासाठी डाँ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डाँ. प्रफुल्ल माळी यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. बियाणे खरेदी करताना प्रत्यक्ष शेताची पाहणी करून त्यानंतरच बियाणे खरेदी केली पाहिजे. इतर ठिकाणी येणारी हळद वेगळ्या वातावरणात वाढत असते. Turmeric Cultivation Training in Aabaloli

कोकणातील विचार करता शेतकऱ्याकडून बियाणे खरेदी केल्यास चांगले उत्पन्न घेता येऊ शकते. एका रोपापासून सरासरी एक किलो हळद मिळते, असा आमचा अनुभव आहे.नवीन उत्साही शेतकरी हळद लागवडीकडे वळत आहेत. चुकीच्या माहिती किंवा पद्धतीने लागवड होऊन अनेक वेळा शेतकरी नाराज होऊन ही शेती सोडतात. असे होऊ नये या उद्देशानेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कारेकर यांनी केल्याचे स्पष्ट केले. Turmeric Cultivation Training in Aabaloli
यावेळी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले की सचिन कारेकर यांनी अनेक वर्षे हळद लागवड करत आहेत. गेली पाच वर्षे लागवड प्रशिक्षण शिबिरातून तब्बल 300 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. Turmeric Cultivation Training in Aabaloli
प्राचीन काळापासून आयुर्वेदात हळदीचे स्थान मोठे आहे. पाच हजार वर्षांपूर्वी कोकणातून राजापूरी हळद निर्यात व्हायची. कोकणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात करून हे गतवैभव पुन्हा मिळवू या, असे आवाहन प्रगतीशील संशोधक शेतकरी सचिन कारेकर यांनी केले. Turmeric Cultivation Training in Aabaloli
यातूनच स्वअनुभवातून एस. के.- 4 ही दर्जेदार हळद जात तयार केली आहे. डाँ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठामध्ये हळदीच्या बत्तीस जातीमध्ये याचा समावेश असून एस. के. – 4 ही तिसऱ्या नंबर वर आहे. विद्यापीठात याची रोपे तयार केली जातात. या नव्या संशोधनाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन गांधीनगर (गुजरात) यांनी घेतली आहे. Turmeric Cultivation Training in Aabaloli
कृषी विस्तारअधिकारी बी. बी. पाटील यांनी आंबा काजू बागेतून आंतरपीक म्हणून हळद लागवड केल्यास बेनणीसाठी लागणारा खर्च वाचतो व पर्यायी हळद पीकातून शेतकऱ्याचा जास्तीचा फायदा होतो. हे व्यवसाय गणित पटवून सांगितले. शेवटी गजेंद्र पौनीकर यांनी हळद रोप तयार कसे करावे याबाबतचे व सचिन कारेकर यांनी शेतात हळद रोप लावण्यापासून हळद तयार होईपर्यंत चे प्रात्यक्षिक दाखवले. Turmeric Cultivation Training in Aabaloli

