मराठी राजभाषा दिनानिमित्त गुहागरात डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात ८ मार्च पर्यत खुले राहणार प्रदर्शन
गुहागर, दि. 01 : ज्ञानरश्मि वाचनालयात (Gyanrashmi Library)मराठी राजभाषा दिन. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर व ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. वाचनालयाचे जेष्ठ वाचक सेवानिवृत्त शिक्षक वामन दांडेकर सर यांच्या व मसाप तसेच वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Book Exhibition at Gyanrashmi Library

त्यावेळी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यातआले. Book Exhibition at Gyanrashmi Library
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा प्रा. मनाली बावधनकर यांनी मराठी राजभाषा दिनाच्या अनुषंगाने आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर यांनी केले. तर कार्यवाह ईश्वर हलगरे यांनी आभार मानले. Book Exhibition at Gyanrashmi Library

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल सोनाली घाडे, शामली घाडे, सानिका जांगळी उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. Book Exhibition at Gyanrashmi Library
सदर पुस्तक प्रदर्शन दि. २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनापासून ८ मार्च महिला दिनापर्यत वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ४ ते ६ यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, वाचकप्रेमींनी, पालकांनी, शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानरश्मि वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. Book Exhibition at Gyanrashmi Library

