गुहागर तालुक्यातील 30 संघांचा सहभाग
गुहागर, ता. 26 : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने दोन दिवस चालणाऱ्या नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे व मंडळाचे माजी अध्यक्ष विलास लोखंडे, वीज मंडळाचे माजी लाईनम अनंत धनावडे, माजी क्रिकेटपटू प्रवीण घाडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील 30 संघांनी सहभाग घेतला आहे. Launch of Cricket Tournament

खालचापाट भाटी येथे दि. 26 व 27 मार्च 2022 रोजी गुहागर नगरपंचायतीचे माजी स्वच्छता आणि आरोग्य सभापती आणि प्रभाग १६ मधील कार्यतत्पर नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सहकार्याने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्या संघाला रोख रक्कम 7007/- चषक, उपविजेत्या संघास 5005/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, सामनावीर, मालिकविर यांची निवड करून चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे. Launch of Cricket Tournament

या उदघाटन कार्यक्रमाला फ्रेंड सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, सुनील गोयथळे, प्रकाश गोयथळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता धनावडे, सुभाष घाडे, दिलीप गोयथळे, उमेश गोयथळे, एकनाथ जाधव, अभिजीत जाधव, गणपत जांगळी, गुहागर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे, हेमचंद्र आरेकर, विजय देवाळे, विवेक मोरे, प्रतीक कदम, रोहन विखारे, अमरदीप जाधव, सुहास जोशी, राज विखारे, दीपक जाधव, विजय जाधव, चंद्रशेखर लोखंडे, निलेश लोखंडे, शैलेश उदेग, शैलेश पाष्ठे, दीपक जाधव, धनंजय लोखंडे, निखिल रेवाले, उमेश कुळे, सागर पाडावे, साहिल लोखंडे आदी उपस्थित होते. Launch of Cricket Tournament
