खरे ढेरे भोसलेच्या विद्यार्थ्यांचे तालुका प्रशासनाने केले कौतुक
गुहागर, ता. 26 : आधुनिक युगात स्त्री-पुरुष भेदभाव न करता समाजातील सर्वांनी स्त्रियांचा आदर करायला हवा. यातच समाजाचा विकास आहे. असे मत गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी व्यक्त केले. खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे पथनाट्य प्रभावी असून त्याचे सादरीकरण तालुक्यातील विविध ठिकाणी करावे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. Street Play on Female Feticide

गुहागर शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूणहत्येबाबत जनजागृतीसाठी पथनाट्य बसविले आहे. त्याचे सादरीकरण तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाणे गुहागरच्या प्रागंणात झाले. त्यावेळी बी.के. जाधव यांनी उत्स्फुर्तपणे ही प्रतिक्रिया व्यक्त केली. Street Play on Female Feticide
खरे-ढेरे–भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell) आणि आजीवन अध्यापन व विस्तार विभाग (Department of Life Long Learning) यांच्या संयुक्त विद्यमाने “स्री भ्रूणहत्या” या विषयावर पथनाट्य बसविले आहे. स्रियांचे समाजातील अस्तित्व. त्यांना पावलोपावली सहन करावी लागणारी वागणूक. कुटंबातील तसेच समाजातून मिळणारी अवहेलना. सोनोग्राफीद्वारे लिंग ओळखून जन्मापूर्वीच त्यांची हत्या करणे. स्रियांची कमी होत असलेली संख्या. त्याचे समाजावर होणारे परिणाम. या विषयांची मांडणी या पथनाट्यात करण्यात आली आहे. थोड ज्ञान साठवा, आपली माय आठवा, नका करू स्रीभ्रूण हत्या असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला आहे. Street Play on Female Feticide

24 फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम या पथनाट्याचे सादरीकरण श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे व बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेतर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थी कलाकारांचे कौतुक केले.
त्यानंतर या पथनाट्याचे सादरीकरण तहसिलदार कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. यावेळी तहसिलदार प्रतिभा वराळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. Street Play on Female Feticide
तर प्रभारी पोलीस निरिक्षक बी. के. जाधव म्हणाले की, अशा उपक्रमातून समाजाच्या प्रबोधनाचे कार्य सोप्या पध्दतीने होते. या पथनाट्याचे सादरीकरण शृंगारतळी आठवडा बाजार, मालाणी मार्ट यासह तालुक्यातील विविध ठिकाणी होण्याची करावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाणे मधील सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यासह शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, अनेक नागरिक उपस्थित होते. Street Play on Female Feticide

त्यानंतर गुहागर शहरातील गांधीचौक या ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष वराडकर व त्यांचे सहकारी, परिसरातील नागरिक यांचीही उपस्थिती होती. Street Play on Female Feticide
या पथनाट्य सादरीकरणात खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील क्षितीज गायकवाड, तंझीला मालगुंडकर, आशुतोष शिर्के, शुभम जाधव, प्राजक्ता जाधव, प्राजक्ता मांडके, सानिका मोरे, आकांक्षा देसाई, साक्षी पाटील, मिहीर बारटक्के, ऋतिक किर्वे, स्वाती जाधव, अभिराज कदम, प्राजक्ता मोहिते हे विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते. Street Play on Female Feticide
पथनाट्य सादरीकरणाचेवेळी DLLE चे समन्वयक प्रा. प्रमोद आगळे, तसेच सदस्य डॉ. आर. जी. गोडसे, डॉ .आर. एस. सोळंके, प्रा. एम. आर. गायकवाड आणि महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. सौ. रश्मी आडेकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

