गुहागर, दि. 24 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रसाद आचरेकर यांची निवड करण्यात आली. २०२२- २३ साठी अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड २३ मार्च रोजी मारुती मंदिर, जोगळेकर कॉलनी येथील सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या कार्यालयात केली. या वेळी मावळते अध्यक्ष सीए आनंद पंडित आणि माजी अध्यक्ष सीए बिपीन शाह यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. Achrekar as branch president of CA Institute

सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा गेल्या सहा वर्षांपासून येथे कार्यरत आहे. यामार्फत विविध कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र, तसेच समाजोपयोगी उपक्रमही राबवण्यात येत आहेत. सीएंकरिता विविध विषयांवरील व्याख्याने, प्रशिक्षण यासह अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. Achrekar as branch president of CA Institute
पदाधिकारी निवड एक वर्षाकरिता व कार्यकारिणीची निवड २०२२ते २०२५ साठी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, कार्यवाह सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए केदार करंबेळकर, विकासा चेअरमन सीए सौ. अभिलाषा मुळ्ये आणि सदस्य म्हणून सीए शैलेश हळबे यांची निवड केली. Achrekar as branch president of CA Institute पुढील वर्षभरात सीए आणि सीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांकरिता उपक्रम राबवणार असल्याचे सीए प्रसाद आचरेकर यांनी सांगितले. Achrekar as branch president of CA Institute

