मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसर, प्रा. डॉ. सोनाली कदम व्याख्याता
गुहागर, दि. 24 : राष्ट्रीय सेवा योजना विभागात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील एन एस एस विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सोनाली कदम या प्रमुख व्याख्याता होत्या. Information of NSS

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी उप परिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. त्यांनी एनएसएसची स्थापना, त्यामागचं उद्दिष्ट, एनएसएसची कार्यप्रणाली सांगत व्यक्तिमत्त्व विकास कसा होऊ शकतो याबाबत विवेचन केले. तसेच भविष्यात होणाऱ्या एन. एस. एस. विभागातील उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. कल्पकता वापरून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येऊ शकतात याची माहिती दिली. Information of NSS
मार्गदर्शक करताना डॉ. सोनाली कदम म्हणाल्या की, विविध प्रकल्प करताना विद्यार्थ्यांमध्ये स्वयंसेवी वृत्ती, प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त, आत्मियता, राष्ट्र भक्ती, नेतृत्वगुण वाढीस लागतात. समाजसेवी संस्था व शासकीय संस्थांशी समन्वय साधून होणारे प्रकल्प, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबिरांमधून मिळणारे अनुभव उपयुक्त ठरतात. पथनाट्यातून जनजागृती केली जाते. विद्यार्थ्यांच्या क्षमता व सुप्त गुणांना वाव देऊन जलसंधारण, स्वच्छता वृक्ष लागवड मोहीम, रक्तदान, जनजागृती असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविता येतात. Information of NSS
यावेळी रत्नागिरी उपपरिसरचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे, प्रा. विजय गुरव, प्रा. सोनाली मेस्त्री, प्रा. निलेश रोकडे उपस्थित होते. एन एस एस स्वयंसेविका कु. शिवानी सुर्वे हिने सर्वांचे आभार मानले. Information of NSS

